टीओडी मीटर हटाव, अंबरनाथ बचाओ!
अंबरनाथ: अंबरनाथ शहरातील नागरिकांच्या घरी, रहिवाशी सोसायटीमध्ये परस्पर नागरिकांना न विचारता ‘महावितरण'कडून केंद्र सरकार पुरस्कृत स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याची मोहीम सुरु असून स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि उद्योजक गौतम अदानी यांच्या विरोधात ६ जून रोजी ‘अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस'चे अध्यक्ष कृष्णा रसाळ पाटील यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच अंबरनाथ शहरात टीओडी मीटर नागरिकांच्या परवानगी शिवाय लावू नये असे निवेदन पत्र देण्यात आले.
या आंदोलनात ‘महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस'च्या प्रदेश सचिव अनिता प्रजापती, माजी नगरसेवक विलास जोशी, अंबरनाथ शहर काँग्रेस प्रशासन-संघटन सरचिटणीस रोहितकुमार प्रजापती, सरचिटणीस नंदू देवडे, सायरा सय्यद, गोपाल राय, राजेंद्र मिश्रा, शंकर गायकवाड, अजिंक्य सावंत, अब्दुलगणी पिरजादे, पुष्पा पनीकर, राईस शेख, अण्णा भालेराव, शोभा बांगर, दीपक भोईर, बानो सय्यद, दिलारा खान, सलीम खान, जगदीश तेलंगे आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.