ओला-उबेर चालकांचा बंद
डोंबिवली : डोंबिवली मध्ये ओला आणि उबर चालकांनी त्यांच्या मागण्यांसाठी १६ जुलै रोजी बंद पुकारला. डोंबिवली पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओला आणि उबेर चालकांनी एकत्र येत सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली. ओला आणि उबर सारख्या कंपन्यांनी निश्चित केलेले भाडे खूप कमी आहे, ज्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे आणि त्यांचे शोषण होत आहे. चालकांच्या मुख्य मागण्या म्हणजे भाडे वाढवणे, त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि कामाच्या परिस्थितीत सुधारणा करणे. ओला-उबेर चालकांनी त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊब योग्य पावले उचलण्याचे आवाहनही सरकारला केले आहे.
मुंबईतील ओला आणि उबर चालकांनी १५ जुलै रोजी संप पुकारला होता. कमी भाड्यामुळे त्यांचे उत्पन्न कमी झाल्याने त्यांचे नुकसान होत आहे. कंपन्यांनी कमिशन दर कमी करावा आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी ओला-उबेर चालकांची मागणी आहे. ओला आणि उबर चालकांचे म्हणणे आहे की, १० कि.मी.च्या प्रवासासाठी त्यांना कमी पैसे मिळतात. ज्यातून इंधन, देखभाल, कमिशन आणि कर वजा केल्यानंतर काहीही शिल्लक राहत नाही. सरकारच्या नियमाप्रमाणे रेट मिळावा या मागणीकरिता डोंबिवली मधील ओला उबेर चालकांनी १६ जुलै रोजी बंद पुकाराला.
आमच्यावर भरपूर अन्याय होत आहे. दिवसरात्र एक करुन आम्हाला रेट कमी मिळत आहे. महागाई वाढत असताना आम्ही ईएमआयवर गाडी चालवित आहोत. आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? असा प्रश्न आम्हाला पडला आहे. आता तर आमची परिस्थिती अशी आली आहे की, आम्ही गाडीचा ईएमआय भरु शकत नाही. वेंÀद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे कंपनीने व्यवस्थित रेट देऊ याबाबत निवेदन दिले आहे. पण, आज ओला-उबेर कंपनी मनमानी करुन आमच्यावर अन्याय करीत आहे. त्यामुळे सरकारने आमच्यावर अन्याय होणार नाही, यादृष्टीने लक्ष द्यावे. आम्हाला योग्य न्याय द्यावा. जर प्रश्न सुटला नाही तर आमच्यावर उपासमारीची वेळ असे साकडे ओला-उबेर चालकांनी यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना घातले आहे.
आमच्यावर केलेल्या अन्यायाविरोधात आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. या आंदोलनात कल्याण-डोंबिवली मधील ओला-उबेर चालकांनी सहभागी होऊन ओला-उबेर वाहने बंद ठेवली. सरकार आमचे म्हणणे ऐकून आमच्या मागण्या मान्य करतील, अशी आम्हाला अपेक्षा असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.