नमुंमपा दिंडी स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धेची १५ सप्टेंबर रोजी अंतिम फेरी
‘रिक्षा चालक-मालक संघटना'तर्फे ‘आरटीओ'ला आंदोलनाचा इशारा
डोंबिवली : स्क्रॅप रिक्षाचा योग्य मोबदला रिक्षाच्या मालकाला मिळत नाही, असे अनेक तक्रार पत्र कल्याण उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाला ‘डोंबिवली रिक्षा चालक-मालक संघटना'ने दिले होते. परंतु, यासंदर्भात रिक्षा चालकाला स्क्रॅपच्या वजनाप्रमाणे पैसे दिले जात नाही असे सांगत ‘संघटना'ने कल्याण येथे उपोषण केले होते. मात्र, त्यावेळी ‘संघटना'ला लेखी आश्वासनाचे गाजर देण्यात आले. भंगार घोटाळा होत असल्याचा आरोप संघटनेने ७ ऑवटोबरला उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मनमानी कारभाराविरोधात डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा गांधी चौकात बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
‘डोंबिवली रिक्षा चालक-मालक संघटना'चे उपाध्यक्ष नंदू परब, कार्याध्यक्ष दत्ता माळेकर, सरचिटणीस प्रमोद गुरव, किशोर सोरखादे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना बेमुदत उपोषणचे पत्र दिले आहे.
८ ऑगस्ट २०२४ पासून बऱ्याच वेळा पत्रकार करुन १५ वर्ष कालबाह्य झालेल्या रिक्षा आणि इतर वाहन स्क्रॅप करतेवेळी रिक्षा आणी इतर वाहन चालक मालकांना जो मोबदला दिला जातो, तो इतर आरटीओ कार्यालयांच्या तुलनेमध्ये तुटपुंजा आहे. ‘कल्याण'चे उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी अशांतोष बारकुल यांना प्रत्यक्ष भेटून ‘डोंबिवली रिक्षा चालक-मालक संघटना'च्या शिष्टमंडळाने सदर बाब लक्षात आणून दिली होती. रिक्षा चालकाला स्क्रॅपच्या वजनाप्रमाणे पैसे दिले जात नाही, रिक्षा मालकाला योग्य मोबदला मिळत नसल्याने ‘संघटना'ने १६ जून २०२५५ रोजी ‘कल्याण आरटीओ'च्या विरोधामध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते. त्यावेळी उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण यांच्याकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण सोडण्यात आले होते, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
‘कल्याण आरटीओ'चे काही कर्मचारी आणि भंगारवाले यांच्याशी आर्थिक साठ लोटे असल्याने त्यांना काहीही फरक पडला नाही. अधिकारी आणि कर्मचारी भंगार घोटाळ्यामध्ये सामील असल्याने चौकशी करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. रिक्षा चालकाला रिक्षा स्क्रॅप केल्यानंतर भंगारच्या वजनाप्रमाणे योग्य मोबदला मिळावा, तो मिळत नसल्याने लोकशाही मार्गाने ‘डोंबिवली रिक्षा चालक-मालक संघटना'च्या वतीने येत्या ७ ऑक्टोबर रोजी उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मनमानी कारभाराविरोधात डोंबिवली येथील इंदिरा गांधी चौकामध्ये बेमुदत उपोषणास बसणार आहे, असा इशारा सदर पत्रातून देण्यात आला आहे.