गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् बुक'मध्ये भिवंडीकर विद्यार्थ्यांना यश
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् बुक'मध्ये भिवंडीकर विद्यार्थ्यांना यश
भिवंडी : २६ एप्रिल रोजी हैदराबाद येथील गाचीबौली इंडोर स्टेडियममध्ये ‘व्हिजन मार्शल आर्टस् ॲकॅडमी'चे अध्यक्ष मशेट्टी विट्टल यांच्या नेतृत्वाखाली गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् अधिकृत करणारे सर्वात मोठे कराटे प्रदर्शन पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ३० वेळचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डधारक ग्रँडमास्टर एम. जयंथ रेड्डी यांनी सहभागींचे अभिनंदन केले.
या भव्य कार्यक्रमात एकूण १८०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये भिवंडी येथील ब्रेव युथ मार्शल आर्टस् असोसिएशन, मार्गदर्शक गुरु देवसानी बंधुंच्या नेतृत्वाखाली सहभाग घेत १५ विद्यार्थ्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करुन उल्लेखनीय यश मिळवले आहे. पार्थ गुरुचरण पंडुरे, धैर्य प्रभाकर नाईक, वेदांत विजय दलाल, मयुरी महेंद्र सरडे, रिया राजेश्वर सिंह, वैभवी धनंजय सिंह, भार्गवी नारायण स्वर्गम, साईईश्वर वज्रेश्वर पसुनुरी, अजय नामदेव राठोड, आनंद संतोष सोनी, करण राजकुमार जयस्वार, अमरीश अशोक वर्मा, आदित्यनाथ अखिलेश वाजपेयी, लकी रुपनारायण विश्वकर्मा, अर्मान आबिद शिरोहा आदि विद्यार्थ्यांनी ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुक'मध्ये यश संपादन केले.
या यशामुळे भिवंडीसह सर्वच स्तरातून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना ग्रँडमास्टर डॉ. राजाराम लक्ष्मीनारायण देवसानी, ग्रँडमास्टर अशोक लक्ष्मीनारायण देवसानी, मास्टर भरत लक्ष्मीनारायण देवसानी यांचे मार्गदर्शन लाभले.