‘राष्ट्रीय ओबीसी महासंघ'चे प्रांत कार्यालयासमोर लक्षणीय आंदोलन
भिवंडी : ठाणे जिल्ह्यातील तालुकास्तरावर ‘राष्ट्रीय ओबीसी महासंघ'चे आंदोलन सुरु असतानाच ‘महासंघ'च्या भिवंडी कार्यकारिणीने राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध मागण्यांसाठी ४ सप्टेंबर सकाळी प्रांत कार्यालयासमोर लक्षणीय ठिय्या आंदोलन केले. यावेळी ‘महासंघ'चे भिवंडी तालुका अध्यक्ष भगवान ठाकूर यांच्यासह स्थानिक नेते यशवंत सोरे, सोन्या पाटील, मनोज गुळवी, रुपेश म्हात्रे, विश्वास थळे, योगेश पाटील, तानाजी मोरे, युवा नेते विरेन चोरघे, उत्तर भारतीय ओबीसी नेते सरोज कामत, मनोज गगे, बामसेफ नेते सुरेश पाटील, यशवंत केणे, अरुण पाटील, कल्पेश केणे, पवन ठाकूर, आदि उपस्थित होते.
दरम्यान, ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा, नाहीतर खुर्च्या खाली करा,” ओबीसी राजा जागा हो, संघर्षाचा धागा हो, आरक्षण आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा अशी जोरदार घोषणाबाजी करत मराठा जातीचे ओबीसीकरण न करता मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देवू नयेत, ओबीसी मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमात १०० टक्के शिष्यवृत्ती लागू करावी, ठाणे शहरात ओबीसी १०० मुले आणि १०० मुलींसाठी वसतीगृह सुरु करावे, ७५ ऐवजी २०० गुणवंत ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात यावी, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरु करुन त्यासाठी निधी द्यावी, महाज्योतीचे कोकण विभागीय कार्यालय ठाण्यात सुरु करावे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी यासह इतर मागण्यांसाठी ‘राष्ट्रीय ओबीसी महासंघ'च्या भिवंडी तालुकातर्फे उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले
यावेळी विविध मागण्यांचे निवेदन प्रांत अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी ‘राष्ट्रीय ओबीसी महासंघ'चे अध्यक्ष डॉ. भगवान ठाकूर, रमेश मुकादम, ‘राष्ट्रीय ओबीसी महासंघ कर्मचारी संघटना'चे ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, नलिनी चौधरी, नंदिनी भोईर, शोभा म्हात्रे, विजय भामरे, दया नाईक, अजय भोईर, प्रा. विनोद पाटील, प्रमोद जाधव, संघर्ष समिती सेक्रेटरी ठाणे जिल्हा चक्रधरी पाटील, पांडुरंग म्हात्रे, आदिंनी विशेष मेहनत घेतली.