मिरा-भाईंदर महापालिका स्कॉच पुरस्काराने सन्मानित

भाईंदरः मिरा-भाईंदर महापालिकेचे कचरा व्यवस्थापन देशात सर्वोत्तम ठरले आहे. कचरा वर्गीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या क्यूआर प्रणालीची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून महापालिकेला २०२५चा प्रतिष्ठित स्कॉच (एख्ध्ण्प्) राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.  

ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी मिरा-भाईंदर महापालिकेने क्यूआर प्रणाली लागू केली होती. नागरिकांनी या प्रणालीचा चांगला प्रतिसाद दिला आहे. सदर प्रणालीमुळे शहरातील कचरा संकलन अधिक सुव्यवस्थित झाले असून तक्रारींच्या निवारणाचा वेग वाढला आहे. तसेच शहरातील स्वच्छतेत मोठी सुधारणा झाली आहे. याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. या प्रणालीला २०२५ चा देशातील सर्वोच्च स्कॉच पुरस्कार मिळाला आहे.

या यशाचे श्रेय महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि संपूर्ण महापालिका टीमच्या अथक परिश्रमांना जाते. तसेच महापालिकेच्या या उपक्रमामुळे मिरा-भाईंदर शहर स्वच्छतेच्या बाबतीत देशातील आघाडीच्या शहरांमध्ये समाविष्ट झाले असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.

क्यूआर प्रणालीबाबत...

ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी मिरा-भाईंदर महापालिकेने क्यूआर प्रणाली लागू केली होती. स्वच्छ एमबीएमसी ॲपद्वारे नागरिकांना त्यांच्या परिसरातील कचरा व्यवस्थापनासंदर्भात तक्रारी नोंदवता येतात तसेच त्वरित निराकरणाची प्रक्रिया पार पाडली जाते. या प्रणालीमुळे शहरातील कचरा संकलन अधिक सुव्यवस्थित झाले असून, तक्रारींच्या निवारणाचा वेग वाढला आहे. नागरिकांना या प्रणालीचा उपयोग केल्यामुळे शहरातील स्वच्छतेत मोठी सुधारणा झाली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जिल्हाधिकारी, कोषागार कार्यालयामधील १२० दुचाकी चालकांना हेल्मेट वाटप