‘अपोलो'मध्ये ७८ बोन मॅरो ट्रान्सप्लांटस् पूर्ण
नवी मुंबई : अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने प्रगत बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट प्रक्रियांमध्ये उल्लेखनीय कामगिरी कायम राखत, ७८ ट्रान्सप्लांटस् करुन महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. या रुग्णालयाने दीर्घकालीन सफलता दर ७० टक्के पेक्षा जास्त नोंदवला आहे. दुसऱ्या देशांमधून आलेल्या रुग्णांबरोबरीने लहान मुले आणि वयस्क अशा दोन्ही रुग्णांवर येथे यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.
ल्युकेमिया, थॅलेसेमिया, सिकल सेल आजार, गंभीर अप्लास्टिक ॲनिमिया, मल्टिपल मायलोमा, मायलोडिस्प्लास्टिक सिंड्रोम आणि काही दुर्मिळ इम्युनोडेफिशियन्सी सारख्या स्थितींमध्ये गुंतागुंतीची मेडिकल आव्हाने असतात. अशावेळी दीर्घकालीन रिकव्हरीसाठी बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशनसारख्या प्रगत उपचारांची गरज असते. बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशनच्या आधी कंडिशनिंगची गरज असत. ट्रान्सप्लान्टेशनच्या नंतर रोगप्रतिकार शक्तीची रिकव्हरी खूप धिम्या गतीने होते. त्यामुळे या रुग्णांना संसर्ग आणि इतर गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असतो.
जेव्हा बोन मॅरो पुरेशा प्रमाणात निरोगी रक्तपेशींचे उत्पादन करु शकत नाही, तेव्हा बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन प्रक्रिया करुन तो बोन मॅरो बदलला जातो. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन युनिट ऑटोलॉगस, हेप्लोइडेंटिकल आणि एलोजेनिक ट्रान्सप्लान्टसह नवीन CAR T - cell थेरपी करण्यासाठी सुसज्जित आहे. या रुग्णकेंद्रित दृष्टिकोनामुळे अपोलो हॉस्पिटल फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही नावाजले जाते.
अपोलो हॉस्पिटल्स आम्ही गुंतागुंतीच्या आणि भरपूर जोखीम असलेल्या बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन प्रक्रिया करीत आहोत, ज्यांचा सफलता दर ७०टक्के पेक्षा जास्त आहे. सदरचा दर जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित बीएमटी केंद्रांच्या सफलता दराच्या तोडीस तोड आहे, असे हॉस्पिटल्सचे कन्सलटन्ट हेमॅटोलॉजी, हेमॅटो-ऑन्कोलॉली आणि बीएमटी प्रोग्राम कोऑर्डिनेटर डॉ. पुनीत जैन यांनी सांगितले.