दिवा-मुंब्रा परिसरातील अनधिकृत १०९ नळजोडण्या खंडीत

ठाणे : ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत सर्व्हिस सेंटर आणि अनधिकृत नळसंयोजन खंडीत करुन पाणीपुरवठा बंद करण्याची मोहिम आयुक्त सौरभ राव यांचे आदेशान्वये सुरु करण्यात आली आहे. १७ ते २२ एप्रिल या कालावधीत दिवा, मुंब्रा परिसरातील एकूण १०९ अनधिकृत नळ संयोजने खंडीत करण्यात आली आहे.

दिवा साबेबाव कोकण रत्न दिवा महोत्सव मैदानाच्या बाजुला १५० मी.मी व्यासाच्या जलवाहिनीवरील अर्धा इंची व्यासाचे १८ आणि पाऊण इंची व्यासाचे ४ अशी एकूण २२, वेताळपाडा येथील १०० मी.मी व्यासाच्या जलवाहिनीवरील अर्धा इंची व्यासाचे एकूण ११, ग्लोबल स्कूलच्या पाठीमागे २०० जलवाहिनीवरील पाऊण इंची व्यासाचे ४ अशी एकूण ९, कोकण रत्न, दिवा महोत्सव मैदानाच्या बाजुला, साबेगाव १५० मी.मी व्यासाच्या जलवाहिनीवरील अर्धा इंची व्यासाचे एकूण ५, मुंब्रा ठाकूरपाडा येथील नाल्याच्या बाजूला अर्धा इंची व्यासाची एकूण ६ नळसंयोजने खंडीत करण्यात आली असून पाणीपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

वारेकर स्कूल जवळ, मुंब्रा देवी कॉलनी १०० मी.मी व्यासाच्या जलवाहिनीवरील अर्धा इंची व्यासाची एकूण ६, साबे गाव येथील नळसंयोजन खंडीत करुन पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. तसेच येथील १०० मी. पी.व्ही.सी पाईप आणि १ मोटर जप्त करण्यात आली आहे. साबेगाव रेल्वे ट्रॅकच्या बाजूला ३०० मी.मी व्यासाच्या जलवाहिनीवरील अर्धा इंची व्यासाची एकूण ५० नळ संयोजने खंडीत करण्यात आली असून ११५० मी.पी.व्ही.सी पाईप आणि मोटर जप्त करण्यात आल्या आहे.
दरम्यान, अशा प्रकारची कारवाई यापुढेही सुरुच राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन करण्यास गती