नवी मुंबई महापालिकेचे मोरबे धरण 100 टक्के भरले

नवी मुंबई : मागील सहा दिवस सुरू असलेल्या संततधार पर्जन्यवृष्टीमुळे नवी मुंबई महापालिकेचे मोरबे धरण 100 टक्के भरले आहे. तसेच मोरबे धरण परिसराच्या पाणलोट क्षेत्रात सततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आज 20 ऑगस्ट रोजी पहाटे 3.10 वाजता मोरबे धरणाचे (12 मी.× 3 मी. आकाराचे )

दोन्ही वक्राकार दरवाजे 25 सेंटिमीटरने उघडण्यात आले असून 1123 क्युसेक पाण्याचा विसर्ग धावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आला आहे. या दरम्यान धरणाच्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढणार असल्याने नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, असे जाहीर आवाहन  नवी मुंबई महापालिकेमार्फत स्थानिक नागरिकांना करण्यात आले आहे.

नवी मुंबई महापालिकेचे प्रतिदिन ४५० द.ल.लि. क्षमतेचे मोरबे धरण पूर्ण क्षमतेने (८८ मी.) भरलेले असून नवी मुंबईच्या जलसमृद्धतेत वाढ झाली आहे. याबद्दल महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आनंद व्यक्त करीत सर्व नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन केले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

गुलाबी नाल्याचे उलगडले रहस्य