नवी मुंबईतून विमाणोड्डाणाला जून २०२५ चा मुहूर्त  

नवी मुंबई : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी रविवारी  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पस्थळी भेट देऊन प्रगतीचा आढावा घेताना प्रकल्पाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राला नवीन आयाम देईल आणि नवी मुंबई व मुंबई शहराच्या वाढत्या गरजा पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या बहुप्रतीक्षित प्रकल्प वेगाने पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत असून जून २०२५ मध्ये नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन प्रस्तावित असल्याचे अदानी ग्रुपच्या वतीने कळविण्यात आले आहे.

नवी मुंबई विमानतळाच्या कामकाजाची पाहणी करताना गौतम अदानींसोबत डॉ. प्रिती अदानी, जीत अदानी, दिवा अदानी, तसेच अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडचे सीईओ अरुण बन्सल आणि एनएमआयएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅफ्टन बीव्हीजेके शर्मा व विविध भागधारक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  

नवी मुंबई विमानतळ प्रकल्प हा नवी मुंबई आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी वाहतूक आणि व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार आहे. सदर विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाची कनेक्टिव्हिटी आणि व्यापार वाढीच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.  

अदानी समूहाद्वारे नवी मुंबई विमानतळ अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केले जात आहे. विमानतळाचा पहिला टफ्पा जून २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून, याठिकाणी प्रवाशांसाठी अधिक सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत.  

विमानतळाचे वैशिष्ट्ये :  
अत्याधुनिक ग्रीनफिल्ड विमानतळ  
वेगवान कनेक्टिव्हिटीसाठी मोठे रस्ते आणि मेट्रो प्रकल्पांशी जोडणी  
उच्च दर्जाच्या प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी आधुनिक सुविधा  
पर्यावरणपूरक आणि सस्टेनेबल इन्फ्रास्ट्रक्चर  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘पनवेल-कर्जत लोकल कॉरिडॉर'ला डिसेंबरचा मुहूर्त