उरणमध्ये काँग्रेस पक्षाला घरघर, पदाधिकाऱ्यांचा ‘भाजपा' प्रवेश

उरण : राज्याचे माहिती-तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत केगांव पंचायत समिती गणातील ‘काँग्रेस'च्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपा पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी ना. आशिष शेलार, आमदार महेश बादली यांनी या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करुन उरण तालुका काँग्रेस पक्षाला मोठा झटका दिला आहे. तसेच दीपावली सारख्या सणाच्या शुभमुहूर्तावर रानसई येथील आदिवासी बांधवांसोबत दिपावली सणाचा आनंद घेतला. यावेळी आदिवासी महिला सुमा ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले.

उरण तालुक्यातील अनेक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आ. महेश बालदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपा पक्षात प्रवेश करत आहेत. केगाव पंचायत समिती गणाचे काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तथा माजी सरपंच राजेंद्र ठाकूर, माजी सरपंच हेमांगी ठाकूर, माजी सरपंच दिपेश कोळी, माजी सरपंच नंदकुमार पाटील, माजी सरपंच भावना पाटील, माजी उपसरपंच नंदकुमार म्हात्रे, मीना म्हात्रे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षात प्रवेश केला आहे.

यावेळी ना. आशिष शेलार, आ. महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी ‘भाजपा'चे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य रवीशेठ भोईर, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घरत, शहराध्यक्ष कौशिक शहा, माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष जसीम ग्रास, पनवेल तालुका मंडळ अध्यक्ष रुपेश धुमाळ, उरण शहर मंडळ अध्यक्ष प्रसाद भोईर, तालुका मंडळ अध्यक्ष धनेश गावंड, महालण विभाग अध्यक्ष महेश कडू, माजी सरपंच जितेंद्र घरत, वाहतूक जिल्हा उपाध्यक्ष रवी वाडेकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून ना. आशिष शेलार यांनी रानसई येथील आदिवासी बांधवांसोबत दिपावली साजरी करत आदिवासी बांधवांसोबत फराळाचा आस्वादही घेतला. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे