नेरुळमधील शिक्षण प्रसारक विद्यालयाचा १०० टक्के निकाल
नवी मुंबई : नेरुळ येथील सेक्टर १२ मधील एनआरबी एज्युकेशनल, सोशल अॅण्ड कल्चरल ट्रस्टच्या शिक्षण प्रसारक विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. या विद्यालयातून ५१ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. हे सर्वच विद्यार्थी चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाले आहे. आदर्श रेवाळे याने ९३.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, तर ब्रह्मेश दारकुंडे याने ९२ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
आरोही कापडणे, अपेक्षा लोहार, दीपिका जाधव, बाजीराव कदम, अनुजा पिंगळे, मनस्वी तेलंगे, राम बावधाणे, साक्षी सोनकांबळे आणि सुजल पवार यांनी दहावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवले आहे. दहावीत उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नामदेव भगत, शाळेच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता कोठेकर, दहावीच्या वर्गशिक्षिका रंजना साळुंके, प्रदीप खिस्ते, शेखर जगताप, भाऊसाहेब आव्हाड, पूर्वा ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.