उल्हासनगर पोलीस हायटेक; चौकाचौकात आता तिसऱ्या डोळ्याचे लक्ष्य

उल्हासनगर : गुन्हे घडल्यावर घटनास्थळी पोहोचणारे पोलीस असा शिका पुसण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालय सज्ज झाले आहे. परिमंडळ-४ मधील ८ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बसवण्यात येत असलेल्या कॅमेऱ्यांचे थेट प्रक्षेपण ज्या कंट्रोल रुममध्ये चालणार आहे, त्याचे उद्‌घाटन पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे एआय तंत्रज्ञानावर आधारित सॉपटवेअरमुळे एखाद्या ठिकाणी गर्दी झाल्यावर त्या कॅमेऱ्याचा व्हिडिओ थेट कंट्रोल रुमच्या टीव्हीवर दिसणार असल्याने पोलीस काही क्षणात तिथे पोहोचणार असल्याचे यावेळी पोलीस आयुवत डुंबरे यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने ५ जानेवारी २०२४ रोजी जारी केलेल्या जीआर मध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या एकूण ५ पोलीस परिमंडळात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी घेतला. पोलीस परिमंडळ-४ च्या हद्दीत उल्हासनगर, मध्यवर्ती, वि्ीलवाडी, हिललाईन, अंबरनाथ, शिवाजीनगर, बदलापूर पूर्व आणि बदलापूर पश्चिम या ८ पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. या ८ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मुख्य चौक तसेच रस्त्यांवर असे मिळून एकूण १५९३ कॅमेरे बसविण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. त्यासाठी संवेदनशील भागात, प्रत्येक मुख्य चौकात कॅमेरे लावण्यासाठी खोदकाम करुन पोल लावण्यात येत आहे.

या कॅमेऱ्याचे थेट प्रक्षेपण परिमंडळ-४ चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या कार्यालयाजवळील कंट्रोल रुम येथे दिसणार आहे. यासाठी ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीने स्वइच्छेने अद्ययावत असा सीसीटीव्ही कंट्रोल रुम उभारुन दिला आहे. या कंट्रोल रुममध्ये २ टीव्ही तसेच वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात आली आहे. या अद्ययावत कंट्रोल रुमचे उद्‌घाटन ९ ऑगस्ट रोजी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कल्याण परिक्षेत्राचे अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, शंकर अवताडे, अशोक कोळी, शब्बीर सय्यद यांच्यासह इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

कंट्रोल रुममधील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन...
परिमंडळ-४ चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी कंट्रोल रुम मध्ये विशेष कर्मचारी वर्ग सीसीटिव्ही प्रक्षेपणावर लक्ष्य ठेवण्यासाठी नियुक्त केला आहे. कॅमेऱ्यातील हालचालींवर लक्ष ठेवून तात्काळ आपत्तीजनक काही दिसल्यास संबंधित पोलीस ठाण्याला कंट्रोल रुमवरुन संपर्क साधायचा, असे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पोलीस निरीक्षक जगदीश खैरनार, पोलीस अंमलदार शिवा कोळी आदि कर्मचारी वर्गाला सांगितले. तसेच एखादा ठिकाणावरुन घडलेल्या घटनेची माहिती देण्यासाठी जागरुक नागरिकाचा फोन आल्यास तात्काळ त्या ठिकाणचे सीसीटीव्ही प्रक्षेपण पाहून त्यातील आरोपींचे फोटो संबंधित पोलीस ठाण्याला पाठवत आरोपी पकडण्याच्या प्रक्रियेत कंट्रोल रुम कर्मचाऱ्यांना महत्त्वाची भूमिका बजावयाची आहे, असे पोलीस आयुवत डुंबरे म्हणाले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘ठामपा वर्षा मॅरेथॉन'मध्ये धर्मेंद्र, रविना गायकवाड विजेते