अमित ठाकरे यांचे नवी मुंबईत जोरदार स्वागत
नवी मुंबई : ‘मनसे'च्या सीवुडस् मधील मध्यवर्ती कार्यालयाचे नुतनीकरण करण्यात आले असून या कार्यालयाचे लोकार्पण तसेच मध्यवर्ती कार्यालयात सत्यनारायण पुजेचे आयोजन ‘मनसे'चे प्रववते तथा नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते. त्याचप्रमाणे नेरुळ गांव, सेक्टर-२० मध्ये ‘मनसे'चे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे आणि ‘मनसे महिला सेना'च्या विभाग अध्यक्ष सौ. भूमिका सविनय म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालय अर्थात ‘मनसे'ची शाखा सुरु करण्यात आली. या दोन्ही कार्यक्रमासाठी मनसे नेते तथा मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान, युवा नेते अमित ठाकरे नवी मुंबईत येणार असल्यामुळे ७ जून रोजी महाराष्ट्र सैनिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. यावेळी मध्यवर्ती कार्यालय येथे अमित ठाकरे यांचे स्वागत ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले. याठिकाणी कार्यकर्त्यांनी भला मोठा हार क्रेनने घालून स्वागत केले. अमित ठाकरे यांनी नेरुळ येथील गांवदेवी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. तसेच नवी मुंबईच्या विकासासाठी ‘मनसे'च्या पारड्यात सत्तेचे दान टाकण्याचे देवीला साकडे घातले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले, विनोद पार्टे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सह सचिव अभिजीत देसाई, नितीन लष्कर, दिनेश पाटील, मनसे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, पालिका कामगार सेना शहर अध्यक्ष अप्पासाहेब कौठुळे, रोजगार विभाग शहर संघटक सनप्रीत तुर्मेकर, चित्रपट सेना उपाध्यक्ष श्रीकांत माने, शहर संघटक अनिकेत पाटील, रस्ते आस्थापना शहर अध्यक्ष संदीप गलुगडे, महिला सेना उपशहर अध्यक्ष अनिथा नायडू, दिपाली ढवूळ, शुभांगी बंदिचोडे, सोनिया धानके, विभाग अध्यक्ष अनिकेत भोपी, विशाल गाडगे, प्रवीण राऊत, भूषण कोळी, अमोल आयवळे, अक्षय भोसले, योगेश शेटे, अभिलेश दंडवते, भूषण आगीवले, चंद्रकांत मंजुळकर, नितीन नाईक, चंद्रकांत डांगे, रोहन पाटील, शाम ढमाले, नागेश लिंगायत यांच्यासह अनेक मनसे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिकांनी उपस्थित होते.