बिहार येथून आलेल्या 17 मुलीवर लैंगिक अत्याचार

नवी मुंबई  : वाशीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने काम मिळवून देण्याच्या बहाण्याने बिहार राज्यातून आलेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गत महिन्याभरात अनेकवेळा जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेतील पीडित मुलीने आपल्या मैत्रिणीला सदर पत्रकाराची माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. वाशी पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी विनोद भागेसिंग बिष्ट (४६) याला बलात्कार आणि पॉक्सो कलमाखाली अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपीची 21 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

या घटनेतील 17 वर्षीय पीडित मुलगी मुळची बिहार राज्यातील आहे. तर आरोपी विनोद बिष्ट हा उत्तराखंड राज्यातला आहे. मात्र सध्या तो वाशी सेक्टर 10 मधील जे एन 2 वसाहतीत राहण्यास आहे. आरोपी विनोद बिष्ट हा भोजपुरी चित्रपटाच्या प्रोडक्शनमध्ये काम करत असल्याने काही दिवसापूर्वी त्याची बिहार राज्यात राहणाऱ्या पीडित मुलीच्या आई सोबत ओळख झाली होती. त्यावेळी त्याने पीडित मुलीच्या आईसोबत चर्चा करताना त्यांच्या मुलीला चांगले काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे पीडित मुलीच्या आईने तिच्या 17 वर्षीय मुलीला आरोपी विनोद बिष्ट याच्याकडे पाठवून दिले होते. 

त्यानंतर पीडित मुलगी मागील महिन्याभरापासून आरोपीच्या घरी राहत होती. याच कालावधीत आरोपी विनोद बिष्ट याने या पीडित मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. गत महिन्याभरात आरोपी विनोद बिष्ट याने पीडित मुलीवर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केले. आरोपी विनोद बिष्टकडून सुरू असलेला लैंगिक अत्याचार असह्य झाल्याने पीडित मुलीने याबाबतची माहिती आपल्या मैत्रिणीला दिल्यानंतर तिने वाशी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. त्यानुसार पीडित मुलीने बुधवारी वाशी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन आरोपी विनोद बिष्ट याच्या विरोधात बलात्कार व पॉक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक केली.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

अखेर ९ वर्षांनी मिळाला न्याय