परेश ठाकूर यांच्या पुढाकारातून रायगड जिल्हा आणि कोकणात कुस्तीला पुन्हा वैभवप्राप्ती - ना. मुरलीधर मोहोळ

ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै. विजय चौधरी, डबल महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे, उपमहाराष्ट्र केसरी पै. किरण भगत

तर महिला कुस्तीत पै.अमेघा घरत, पै. सुष्टी भोसले ठरले किताबाचे मानकरी

पनवेल : रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी रायगड जिल्ह्यात कुस्तीसाठी पुढाकार घेतला आहे, त्यामुळे आता रायगड जिल्हा आणि कोकणातही कुस्तीला वैभव मिळणार आहे, असे गौरवोदगार केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कामोठे येथे काढले.

महाराष्ट्राच्या मातीतून जन्मलेली आणि राज्याच्या परंपरेशी नाळ जुळवणारी कुस्ती केवळ खेळ नसून, शौर्य, परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. याच परंपरेला पुन्हा उजाळा देत पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते आणि युवकांचे प्रेरणास्थान परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएश तर्फे ‘मा.श्री.परेशशेठ ठाकूर केसरी' भव्य कुस्ती स्पर्धा कामोठे सेक्टर-६ मधील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या भव्य मैदानात लाल मातीवर आणि दर्जेदार आयोजनात पार पडली. या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून ना. मुरलीधर मोहोळ, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांची उपस्थिती लाभली. यावेळी ना. मुरलीधर मोहोळ बोलत होते.

रायगड जिल्ह्यात कबड्डीपेक्षा कुस्ती कमी प्रमाणात खेळली जाते. पण, कुस्ती स्पर्धेच्या माध्यमातून कुस्तीचा प्रचार आणि प्रसार होत आहे. परेश ठाकूर रायगड जिल्ह्याचे नेतृत्व करत असल्याने आता कुस्तीला चांगले दिवस येऊन या ठिकाणी खूप चांगले मल्ल घडतील, अशी अपेक्षा ना. मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली.

मुख्य कुस्ती स्पर्धा

पुरुष कुस्ती : रुस्तम ए हिंद पै. सिकंदर शेख विरुध्द हिंद केसरी पै. सुखविंदर सिंह (पै. सिकंदर शेख विजयी)

ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै. विजय चौधरी विरुध्द पै. रिकार्डो अमेरिका (अमेरिका) (पै. विजय चौधरी विजयी)
डबल महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे विरुध्द हिंद केसरी पै. विक्रांत कुमार (पै. शिवराज राक्षे विजयी)
उपमहाराष्ट्र केसरी पै. किरण भगत विरुध्द हिंद केसरी पै. हितेंद्र कुमार (पै. किरण भगत विजयी)

महिला कुस्ती : पै. अमेघा घरत विरुध्द पै. सुमन शर्मा (पै. अमेघा घरत विजयी)
पै. सुष्टी भोसले विरुध्द पै. सोनिया तोमर (पै.सृष्टी भोसले विजयी) 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका आरोग्य विभागाचा बेफिकिरीपणा