पनवेल मधील समस्यांची महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी
पनवेल: पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक-१९ मध्ये ठिकठिकाणी असलेल्या गटारांमध्ये पाणी साचण्याची समस्या नागरिकांना भेटसावत आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या समस्यांची २२ फेब्रुवारी रोजी पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात करुन गटारांमध्ये पाणी साचण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन परेश ठाकूर यांनी दांडेकर हॉस्पीटल समोर उभारण्यात येत असलेल्या शाळेच्या कामाची पाहणी केली.
पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर नेहमीच नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून त्या सोडवण्याचे काम करत आहेत. महापालिका प्रभाग क्रमांक-१९ मधील एसटी स्टँड, उरण नाका, मिडल क्लास हौसिंग सोसायटी मधील गटारे तुंबण्याची समस्या नागरिकांना भेडसावत आहे. या पार्श्वभुमीवर परेश ठाकूर यांनी या गटारांची पाहणी केली. पनवेल मधील दांडेकर हॉस्पिटल समोर महापालिका मार्फत कन्या शाळा, सरस्वती विद्या मंदीर, दगडी शाळा या एकत्रितपणे उभारण्यात येत आहेत. या शाळेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाची पाहणीही परेश ठाकूर यांनी केली.
यावेळी महापालिका ‘ड’ प्रभाग समिती सभापती ॲड. वृषाली वाघमारे, नगरसेवक अनिल भगत, नगरसेविका रुचिता लाेंढे, भाजप नेते ॲड. जितेंद्र वाघमारे, शहर अभियंता संदीप कटेकर, साळुंखे, आरोग्य विभाग अधिकारी संजय जाधव, यतिन देशमुख यांच्यासह भाजप पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.