शिरवणे महापालिका शाळेतील सभागृहाचे लोकार्पण

नवी मुंबई ः रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत शिरवणे मधील स्वर्गीय अरुण सुतार मा.सरपंच माध्यमिक शाळा क्रमांक-१०१ येथे नवी मुंबई महापालिका शाळेच्या इमारतीत उभारण्यात आलेल्या प्रशस्त सभागृहाचे उद्‌घाटन माजी महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. महापौर निधी अंतर्गत केलेल्या सदर सभागृहाचे नामकरण शिरवणे ग्रामस्थ राष्ट्रभाषा रत्न कै.गोवर्धन राघो म्हात्र सभागृह असे करण्यात आले आहे.
सदर उद्‌घाटन प्रसंगी ‘भाजपा’चे जिल्हा महामंत्री डॉ. राजेश पाटील, माजी नगरसेवक काशिनाथ पाटील, ओबीसी सेलचे अध्यक्ष राजेश पाटील, माजी नगरसेविका सौ. माधुरी सुतार, कै.गोवर्धन म्हात्र यांचे सुपुत्र जितेंद्र गोवर्धन म्हात्रे, समाजसेवक जयेंद्र अरुण सुतार, महिला संघटक सौ. निर्मला सुतार, हनुमंत रोडे, प्रभाकर ठाकूर, दीपेश पाटील, नरेश सुतार, मीनाक्षी हिलाल, जाधव, जयेश पवार, महापालिका शाळेचे मुख्याध्यापक मंगल भोईर यांच्यासह इतर मान्यवर  उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई महापालिकेचा सन 2022-23चा अर्थसंकल्प जाहिर, कोणतीही करवाढ नाही