मोफत ई- श्रमकार्ड बनविण्याचा कार्याचा शुभारंभ

पनवेल : जे.एम. म्हात्रे चॅरीटेबल सामाजिक संस्था व श्री सुभाषशेठ भोपी सामाजिक विकास संस्थेच्या वतीने रिटघर येथे नागरिकांना मोफत ई- श्रमकार्ड बनविण्याचा कार्याचा शुभारंभ झाला

             पनवेल रिटघर येथे  श्री सुभाषशेठ भोपी सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक सुभाष भोपी आणि ...आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्रचे  उपाध्यक्ष  भारत भोपी या पिता- पुत्राच्या औदार्यातून आणि जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेलचे अध्यक्ष प्रितमदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून.व... केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांच्या संकल्पनेतूनरिटघर, दूंदरे चिंचवली, शिवनसई आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्यां व आदिवासी बांधवांच्या भविष्यासाठी भारत सरकारच्या एका कल्याणकारी योजनेचं अर्थात *ई-श्रमकार्ड* बनवून देण्याचं आदर्शवत व प्रेरणादायी कार्य कार्ड बनवून घेणाऱ्या नागरिकांकडून  कुठलाही मोबदला न घेता अगदी मोफत बनवून देण्याच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाचा शुभारंभ शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील प्रितमदादा म्हात्रे साहेब, सुभाष भोपी, राजू मुंबईकर राजेश केणी साहेब, भारत भोपी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. 

          

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मनपाच्या पाण्यावर ठेकेदारांचा डल्ला