मनपाच्या पाण्यावर ठेकेदारांचा डल्ला 

नवी मुंबई-:स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात ठेकेदारांमार्फत मनपाची स्थापत्य कामे सुरू आहेत. मात्र सदर कामे करताना ठेकेदारांकडुन मनपाच्या पाण्यावरच  डल्ला मारला जात असल्याचे उघड झाले आहे. 

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत तसेच  इतर स्थापत्य कामांचे ठेके ठेकेदारांना देण्यात आले आहेत आणि सदर ठेके देतेवेळी मनपा आणि ठेकेदार यांच्यात अटीशर्तीच्या अधीन राहुन रीतसर करार केला जातो. त्यात कामावर महिला नसणे, पाण्याची व्यवस्था ठेकेदाराने करणे, कामगारांची सुरक्षा, रात्री काम न करणे अशा अनेक अटींचा समावेश असतो. मात्र नवी मुंबई शहरात बहुतांश ठेकेदार या नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. तर या कामात अभियंत्यांचे हात ओले होत असल्याने या ठेकेदारांना अभियंते नेहमीच पाठीशी घालत असल्याचे वारंवार समोर येत आहे. ठाणे बेलापूर मार्गावर देखील मनपातर्फे स्थापत्य कामे सुरू आहेत. मात्र सदर कामे करताना ठेकेदारामार्फत मनपाच्या ई टॉयलेट च्या पाण्यावर डल्ला मारून काम सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा प्रकारे पाण्यावर डल्ला मारणाऱ्या व या कामावर देखरेख ठेवणाऱ्या मनपाच्या अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा - मनोहरशेठ भोईर