मार्च महिन्यात मेट्रो सुरु
खारघर : डिसेंबर महिन्यात नवी मुंबई मेट्रो सुरु करण्यात येणार असल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले होते. मात्र मेट्रो मार्गावरील काही स्थानकाचे काम अपूर्ण होते. मात्र गेल्या दीड महिन्यात अपूर्ण काम पूर्ण अवस्थेंत आहे. त्यामुळे मार्च महिन्यात नवी मुंबई मेट्रो सुरु होणार असल्यामुळे महामेट्रोने मेट्रोसाठी लागणारे अधिकारी, कर्मचारी यांची भरणा केली असून सुरक्षा रक्षकांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे,
नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणाऱ्या नवी मुंबई मेट्रोच्या सर्व डबे आणि विद्युत यंत्रणेला भारतीय रेल्वे मंडळाकडून शुक्रवारी मंजुरी मिळाली आहे. गेल्या वर्षी या मार्गाची ऑसिलेशन, विद्युत, अत्यावश्यक ब्रेक यांच्या चाचण्या झाल्या असून र्सिच डिझाइन अॅण्ड स्टर्डड ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) या रेल्वे संस्थेकडून प्रमाणपत्रही मिळाली आहेत. तर लवकरच स्थापत्य कामांची पाहणी झाल्यानंतर मेट्रो रेल्वे सुरक्षा व रेल्वे प्रशासनाकडून मेट्रो सुरू करण्यास परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे मेट्रोसाठी लागणाऱ्या तज्ञ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पेंधर, तळोजा पेठाली, अमनदूत, पेठपाडा आणि सेंट्रल पार्क स्थानका दरम्यान धावणाऱ्या तीन डब्याची मेट्रो सुरु झाल्यावर त्यासाठी लागणारे ट्राफिक कंट्रोलर, डेपो कंट्रोलर, रेल्वे गार्ड ,ट्रेन ऑपरेटर,तिकीट काउंटर, आदी अधिकाऱ्यांची वर्तमान पत्राद्वारे जाहिरात देवून भरणा केली आहे. भरणा केलेले अधिकारी विविध मेट्रो मध्ये काम केलेले तज्ञ सर्व प्रशिक्षित आहे. तसेच मेट्रो स्थानकावर सुरक्षा अधिकारी, सुरक्षा रक्षक आणि स्टेशनच्या स्वच्छतेसाठी स्वीपर आदी जवळपास दोनशे अधिकारी कर्मचारी मनुष्यबळाची भरणा करण्यात आली आहे.
या विषयी सिडकोकडे विचारणा केली असता, महामेट्रोला मेट्रोसाठी लागणारे कर्मचारी अधिकारी भरणाचे अधिकार देण्यात आले आहे. तर महामेट्रोच्या अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता, मेट्रो सुरु झाल्यावर त्यासाठी लागणारे अधिकारी, कर्मचारी हे सर्व अनुभवी आहेत. मेट्रो स्थानकाची सुरक्षा कशा प्रकारे असावी यासाठी सुरक्षा अधिकाऱ्याकडून सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मेट्रो सुरु झाल्यावर कोणत्याही प्रकारची उणीव भासणार नाही. अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.