अति उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी येत्या रविवारी सकाळी पामबीच मार्ग ४ तासासाठी बंद  

नवी मुंबई : वाशी ते दारावे या दरम्यान असलेल्या ४००  केव्ही मल्टीसर्किट अतिउच्च ताब्याच्या विद्युत वाहिन्या बदलण्याचे काम सध्या सुरू असून येत्या रविवारी पाम बीच मार्गावरील मोराज सिग्नल ते सारसोळे सिग्नल परिसरात वरुन जाणा-या अतिउच्च दाबाच्या ९ जुन्या वाहिन्या काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे येत्या रविवारी २० फेब्रुवारी रोजी सकाळी ५. ३० ते ९ या कालावधीत पामबीच मार्गावरील दोन्ही मार्गावरील वाहतुक बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत सदर मार्गावरील वाहतुक दुस-या मार्गावरुन वळविण्यात आली आहे.  

खारघर विक्रोळी ट्रान्समिशन लिमिटेड या कंपनीच्या वतीने वाशी ते दारावे या दरम्यान असलेल्या ४०० के.व्ही मल्टीसर्किट अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिनीवरील जुन्या वाहिन्या (तारा) काढुन त्याठिकाणी नवीन विद्युत वाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी गत रविवारी नेरुळ भागातील राजीव गांधी उड्डाणपुल व त्या लगत असलेल्या व त्या परिसरातून जाणा-या अतिउच्च दाबाच्या ९ जुन्या तारा काढण्याचे काम करण्यात  आले. त्यानंतर येत्या रविवारी २० फेब्रुवारी रोजी सकाळी पामबीच मार्गावरील मोराज सिग्नल ते सारसोळे सिग्नल परिसरात वरुन जाणा-या अतिउच्च दाबाच्या ९ जुन्या वाहिन्या काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.  

त्यामुळे येत्या रविवारी २०फेब्रुवारी रोजी सकाळी ५. ३०  ते ९ या कालावधीत पामबीच मार्गावरील दोन्ही मार्गिकेवरील वाहतुक बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत या भागातून जाणाऱ्या वाहन चालकांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक विभागाने पामबीच मार्गावरील वाहतूकीत काही प्रमाणात बदल करुन या मार्गावरुन जाणा-या व येणा-या वाहन चालकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करुन दिले आहेत. त्यानुसार वाहन चालकांनी वाहतुकीत केलेल्या बदलाची नोंद घेऊन पर्यायी मार्गावरुन आपल्या इच्छित स्थळी जाण्याचे आवाहन वाहतुक पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवीन पनवेल कोमसापच्या अध्यक्षपदी गणेश कोळी