सिडकोने  खारघर हिल वरील नेचर पार्कचा प्रकल्प गुंडाळला

खारघर: सह्याद्रीच्या पर्वतरांगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  खारघर टेकडीवरील  झाडे जगविणे,रोप लागवड करून  वणव्यापासून रक्षण करून  बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान सारखे उद्यान निर्माण,उद्यान उभारण्यासाठी सिडकोने पाच वर्षांपूर्वी  दहा कोटीहुन अधिक  रुपये खर्च खारघर टेकडीवर नेचर पार्क उभारण्याचा संकल्प करून ऐंशी हजाराहून अधिक रोप लागवड देखील केली होती.मात्र सिडकोने नेचर पार्क प्रकल्प गुंडाळल्याने पर्यावरण प्रेमी मध्ये नाराजी पसरली आहे. नवी मुंबई आणि खारघरचा विकास करताना खारघर टेकडीवर ठाणे आणि पनवेल  वनविभागाचा  जवळपास साडे चौदाशे हेक्टर क्षेत्र हे वन विभागाचे क्षेत्र तसेच उर्वरित सहाशे सत्तर हेक्टर क्षेत्र हे वनेतर क्षेत्र आहे.त्यामुळे वनविभागाच्या क्षेत्रातील जागेत सिडकोच्या सहकार्याने नैसर्गिक संपत्तीच्या जोपासणे बरोबर वन्यजीव संरक्षण व संवर्धन करण्यासाठी संपूर्ण क्षेत्राला कुंपन,वॉच टॉवर,ग्रीन वॉक विकसीत करून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नंतरचे रहिवाशी क्षेत्राजवळील म्हणून सर्वात मोठे नेचर पार्क  विकसीत करण्यासाठी सिडकोने दोन हजार सहा सात साली हा प्रकल्प हाती घेतला होता.  गेल्या तीन दहा  वर्षात सिडकोने ऐंशी हजाराहून अधिक रोप लागवड करून संवर्धन केली . त्यासाठी जवळपास सिडकोने दहा कोटीहून अधिक रुपये खर्च केले, रोप लागवडीमुळे टेकडीचे रूप पालटले होते. चोहीकडे झाडेच झाडे दिसत होती. मात्र गेल्या दोन वर्षांपासून सिडकोने उद्यान विकसित करण्यासाठी लागणारी आर्थिक मदत बंद केल्यामुळे नेचर पार्कचे काम गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याचे ठाणे आणि पनवेल वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकाळ सी बोलताना सांगितले. या विषयी सिडकोच्या जनसंर्पक अधिकारी प्रिया रातांबे यांच्याशी संपर्क केला असता होवू शकला नाही.  

खारघर परिसरातील गावे ,आदिवासी पाडे तसेच शिरवणे ,नेरुळ कुमशेत आदी गावे आणि नेरुळ तुर्भे एमआयडीसी मधील असलेल्या झोपडपट्टीतील काही नागरिक खारघर टेकडीवरील झाडांची कत्तल करून त्याचा उपयोग स्वयंपाकसाठी करीत असे, दरम्यान  सिडकोने ठाणे आणि पनवेल  वनविभागाच्या सहकार्याने नवी मुंबईतील निसर्गाची जपणूक व संवर्धन करण्यासाठी डोंगर माथ्यावर विस्तीर्ण नेचर पार्क या प्रकल्पाच्या माध्यमातून ऐंशी हजार झाडे,तलाव,बंधारे उभारले होते. वृक्षारोपणा बरोबरच ,जमिनीचे भूस्खलन थांबवणे,वणव्यापासून आदी कामामुळे खारघर डोंगरावर हिरावाई पसरली होती. सिडकोने हा प्रकल्प गुंडाळल्याने खारघर डोंगरावर होणारी वृक्ष तोड,नागरिकांच्या पार्ट्या करताना दारूच्या बाटल्या,प्लास्टिक खारघर डोंगराला पूर्वी सारखे दिवस येणार येतील आणि त्यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होवू शकते. या विषयी वन विभागाच्या अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता, लावलेली झाडे वाचविण्यासाठी सिडकोने परिसरातील पाड्यातील आठ ते दहा व्यक्तींची  ठोक मानधनावर  सुरक्षा रक्षक म्हणून नेमणूक करून डोंगराचे जतन करावे. सिडकोने त्याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात खारघर टेकडीचे सपाटीकरण व्हायला वेळ लागणार नाही. 

  सिडकोच्या पर्यावरण विभागातील अधिकारी कर्मचारीकडे विचारणा केली असता, ज्या अधिकाऱ्याचा काळात हा प्रकल्प सुरु झाला होता. त्या अधिकाऱ्यांची राज्यात इतर ठिकाणी बदली झाली आहे. तसेच सिडकोला खारघर टेकडीवरील पर्यावरणाचे संवर्धन करावयाचे असेल तर त्या ठिकाणी पदपथ, बसण्यासाठी बाकडे आदी कामे करू नये टेकडी आहे. त्या परिस्थितीत ठेवून डोंगरावरील वृक्ष तोड होवू नये तसेच डोंगरावर पार्ट्याना बंदी घालावी.त्यासाठी सिडकोने कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा काही कामगाराची नेमणूक करून डोंगरावरील पर्यावरण ठिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

समुपदेशनाद्वारे २१६ जोडप्यांचे संसार पुन्हा जुळले