एपीएमसी बाजारात स्ट्रॉबेरी आवक वाढण्यास सुरुवात

नवी मुंबई -: महाबळेश्वर मधील प्रसिद्ध अशा  स्ट्रॉबेरीची आवक वाढण्यास वाशीतील कृषी उत्पन्न बाजार आवारातील फळ मार्केट मध्ये सुरुवात झाली असून नाशिक येथून देखील स्ट्रॉबेरी दाखल होत आहे.

 सोमवारी बाजारात ४५०० क्रेट दाखल झाले असून यामध्ये ३००० हजार क्रेट महाबळेश्वर पाचगणी  तर १ हजार ५०० क्रेट नाशिक येथून दाखल होत आहेत. बाजारात नोव्हेंबर अखेरीस तर डिसेंबर मध्ये स्ट्रॉबेरी आवक होण्यास सुरुवात होते. परंतु यावेळी अवकाळी पावसाने सुरुवातीच्या उत्पादनावर परिणाम झाला होता, त्यामुळे स्ट्रॉबेरीचा हंगाम लांबला होता.

     एपीएमसी बाजारात नोव्हेंबरमध्ये स्ट्रॉबेरी दाखल होण्यास सुरुवात होते व डिसेंबर महिन्यात हंगाम सुरू होतो. डिसेंबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाने उत्पादन कमी झाले होते. डिसेंबर महिन्यात २०० ते ३०० क्रेट दाखल झाली होती, ही आवक वाढून बाजारात आता ४५०० ते  क्रेट स्ट्रॉबेरी दाखल होत आहे.  स्ट्रॉबेरी हे थंडीत पिकणारे फळ असल्याने त्याचा मुख्य बहर डिसेंबर, जानेवारी महिन्यांत असतो. हा बहर जून महिन्यापर्यंत सुरू राहतो. मात्र अवकाळी पावसाने ऐन हंगामात उत्पादनाला  फटका बसला होता. त्यामुळे आवक उशीराने झाली.  आता उष्ण दमट हवामान असून बाजारात मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.  बाजारात प्रतिकिलो स्ट्रॉबेरीला  १६०-२८० रुपये बाजारभाव आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शौचालय अस्वच्छ आढळल्यास कडक कारवाईचे आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश