बेलापुर किल्यावर स्वच्छता अभियान
नवी मुंबई-: नवी मुंबईतील ऐतिहासिक अशा बेलापूर किल्ल्यावर सामाजिक कार्यकर्त्या दर्शना भोईर, NSS ची टिम आणि नवी मुंबई महानगरपालिका कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही रविवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी स्वच्छता अभियान राबवत किल्ल्याच्या परिसराची सफाई करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अपार पराक्रम गाजवत गडकिल्ले जिंकले आणि बांधले आणि त्यातीलच एक किल्ला नवी मुंबई सारख्या आधुनिक शहरात आहे ही नवी मुंबईकरांसाठी अभिमानाची बाब आहे. आपल्या या प्रिय महाराष्ट्राची खरी दौलत हि शिवरायांनी बांधुन ठेवलेले गडकिल्ले आहेत. शेकडो वर्षापासुन मोठ्या डौलाने हि गडकिल्ले शिवरायांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या महापराक्रमाची साक्ष देतायत त्या गडकिल्यांची स्वच्छता राखुया त्या गडकिल्यांचे संरक्षण करणे आज काळाची गरज आहे.आणि याच अनुषंगाने सामाजिक कार्यकर्त्या दर्शना भोईर, NSS ची टिम, आणि नवी मुंबई महानगरपालिका कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी बेलापूर किल्यावर स्वच्छता अभियान राबवत किल्ल्याची साफसफाई करण्यात आली.
तर शिवरायांचे हे गडकिल्ले महाराष्ट्राचे वैभव आहे. अभिमान आहे, अस्मिता आहे. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात गडकिल्यांच्या संवर्धनासाठी भरघोस तरतूद करावी. आपल्या महाराष्ट्राचा संपुर्ण जगाने हेवा करायला हवा. अशा पध्दतीने गडकिल्यांची स्वच्छता राखावी, संरक्षण करावे, असे आवाहन देखील दर्शना भोईर यांनी केले आहे.