महापालिकेकडून र्निबंधांमध्ये शिथीलता
वी मुंबई ः राज्यामध्ये कोव्हीड-१९ विषाणुचा प्रादुर्भाव कमी होत असून कोव्हीड रुग्णसंख्येतही दिवसेंदिवस घट होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात हॉटेल, रेस्टॉरंटच्या वेळांमध्ये तसेच धार्मिक, इतर कार्यक्रमांच्या निर्बंधांमध्ये शिथीलता दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका क्षेत्रातही कोव्हीड-१९ विषाणुचा प्रादुर्भाव कमी होऊन रुग्णसंख्येतही घट होताना दिसत आहे. त्याअनुषंगाने नवी मुंबई महापालिका प्रशासनाने, कार्यक्षेत्रामधील विविध क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक स्तरातून कोरोना विषयक निर्बंध शिथील करण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे करण्यात आलेली आहे. त्यानुसार महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक उद्याने, मैदाने तसेच क्रीडा विषयक बाबी सुरु करण्यासाठी प्रशासनाकडून यापूर्वी लादण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात आली आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाने जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक सुचनांनुसार शहरातील उद्याने आता सायंकाळच्या वेळतही सुरु होणार आहेत. क्रीडा संकुलांमध्ये आऊटडोअर खेळाच्या सराव आणि स्पर्धांसाठी परवानगी देण्यात येणार आहे. तर जलतरण तलाव आता ५० टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नवी मुंबईची संपूर्ण अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यापासून ओमायक्रॉन तसेच कोरोनाच्या नवीन व्हेरीएंटचा धोका आणि कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव विचारात घऊन कोरोना विषाणू संक्रमणाची साखळी खंडीत करण्याच्या दृष्टीकोनातून आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत ८ आणि ९ जानेवारी २०२२ रोजीच्या आदेशान्वये राज्य सरकारने संपूर्ण राज्यात मार्गदर्शक सूचना जारी करुन र्निबंध लागू केले होते. त्यानुसार नवी मुंबई महापालिका हद्दीत महापालिका प्रशासनाकडून निर्बंध लागू करण्यात आले होते.
दुसरीकडे राज्यापाठोपाठ नवी मुंबई महापालिका हद्दीत देखील कोव्हीड-१९ विषाणुचा प्रादुर्भाव कमी होत असून कोरोना रुग्णसंख्येतही दिवसेंदिवस घट होत असल्याचे निदर्शनास आले आहे. नवी मुंबई महापालिका श्रेत्रात ११ फेब्रुवारी र्पयंत ७६० रुग्ण सक्रिय आहेत. त्यामुळे नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील विविध क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक स्तरातून निर्बंध शिथील करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी देखील सदर मागणीची दखल घत ३१ डिसेंबर २०२१ आणि १० जानेवारी २०२२ रोजी काढलेल्या आदेशामध्ये अंशतः बदल करीत कार्यक्षेत्रातील सार्वजनिक उद्याने, मैदाने तसेच क्रीडा विषयक बाबी सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
त्यानुसार सार्वजनिक उद्याने, मैदाने केवळ व्यायाम, चालणे, धावणे आणि सायकलींग याकरिता सकाळी ५.३० ते १० वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व क्रीडा संकुलातील मैदानामध्ये कोव्हीड विषयक सुरक्षा नियमांचे पालन करुन आऊटडोअर खेळाच्या सराव आणि स्पधेसाठी तसेच प्रशिक्षण शिबीराच्या आयोजनासाठी परवानगी देण्यात आली आहे. इनडोअर आणि आऊटडोअर खेळासाठी आठवड्याचे सर्व दिवस नियमित वेळेनुसार परवानगी राहिल. कोणत्याही खेळाच्या स्पधेच्या आयोजनाबाबत उपस्थित प्रेक्षकांची मर्यादा एकूण आसन क्षमतेच्या २५ टक्के राहील. उभे किंवा फिरत्या प्रेक्षकांना परवानगी असणार नाही. जलतरण तलाव ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.