सारसोळे खाडीत डॉल्फिनचे दर्शन; लोकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण

मुंबई : खोल समुद्रात मनसोक्त विहार करणाऱ्या डॉल्फिन माशांची जोडी नेरुळ येथील सारसोळे खाडीत पहावयास मिळाली. खाडीत डॉल्फिन मासा आढळल्याने लोकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. मागील वर्षी देखील असे डॉल्फिन खाडीत आढळले होते.

नवी मुंबईतील सारसोळे खाडीलगत डॉल्फिन जलविहार करताना नवी मुंबईतील सारसोळे कोळीवाड्यातील मच्छीमारांनी प्रत्यक्षात पाहिले. बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली, सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल झाल्यामुळे डॉल्फिन मासा हा सर्वांसाठी चर्चेचा विषय बनला. खोल समुद्रात आढळणारा हा डॉल्फिन मासा भरकटल्यामुळे मुंबई आणि नवी मुंबईच्या मध्यभागी असलेल्या सारसोळे खाडीत आला असावा. नवी मुंबईतील सागर भोईर या मच्छीमाराने या डॉल्फिनचा व्हिडीओ व्हायरल केला असल्याचे नवी मुंबईतील काही मच्छीमारांनी सांगितले.  तर मागील वर्षी देखील या खाडीत डॉल्फिनचे दर्शन घडले होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 थकबाकीदारांना बँकेने पूर्व सूचना, नोटीस देण्याची मागणी