जैवविविधता केंद्रात लवकरच खारफुटी सेंटर, म्युझियम
नवी मुंबई ः आमदार गणेश नाईक यांनी ऐरोली विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांचा पाहणी दौरा केला. या पाहणी दौऱ्यात त्यांनी विकास कामांना गती देण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. जैवविविधता केंद्रात खारफुटी सेंटर-म्युझियम... माजी आमदार संदीप नाईक यांनी पर्यटकांना आकर्षित करणारे आणि नवी मुंबईच्या समृध्द जैवविविधतेचे दर्शन घडविणारे सेंटर ऐरोली येथे उभ रहावे यासाठी सर्वप्रथम मागणी केली होती. तसेच तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर या केंद्राच्या कामाला गती मिळाली होती. आमदार गणेश नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे ऐरोलीतील जैवविविधता केंद्रामध्ये सुमारे ३० कोटी रुपये खर्चून खारफुटीची माहिती देणारे केंद्र आणि पलेमिंगो सह अन्य पक्षी त्याच बरोबर सागरी पक्षी, प्राणी माशांच्या प्रजाती यांची माहिती देणारे अद्ययावत म्युझियम उभ राहणार आहे. या वास्तू उभ्या राहिल्यावर त्यांची देखभाल उत्तम प्रकारे करण्याची व्यवस्था निर्माण करण्याची सूचना जैवविविधता सेंटरच्या भेटीत आमदार नाईक यांनी वन विभागाचे अधिकारी कोकरे यांना केली.
तसेच जैवविविधता केंद्रामध्ये नव्याने निर्माण होणाऱ्या खारफुटी माहिती केंद्र आणि म्युझियम या प्रकल्पांमध्ये स्थानिक बांधवांना रोजगार उपलब्ध करुन देतानाच जैवविविधता केंद्रामुळे ज्यांचे पारंपारिक रोजगार बंद झाले आहेत, त्यांना प्राधान्याने या प्रकल्पामध्ये रोजगार मिळाले पाहिजेत अशी आग्रही मागणी आमदार नाईक यांनी केली. दिवा जेट्टीचे लवकरच नुतनीकरण... दिवा गांव आणि परिसरातील स्थानिक आगरी-कोळी बांधव परंपरागत व्यवसायासाठी दिवा जेट्टीचा वापर वर्षानुवर्ष करीत आहेत. या जेट्टीची लांबी वाढविण्याची मागणी आ. गणेश नाईक यांनी केली होती. त्यानुसार या केंद्रातील विकास ऐरोली काटई उन्नत मार्गावर काटई आणि मुंबई करिता चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिका एमएमआरडीए बांधत असलेल्या ऐरोली ते काटई या उन्नत मार्गावर नवी मुंबईत काटई च्या दिशेने आणि मुंबईच्या दिशेने चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिका ठेवण्याची मागणी सर्वप्रथम ऐरोलीचे प्रथम आमदार संदीप नाईक यांनी केली होती. नवी मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाच्या या मार्गीकासाठी विद्यमान आमदार लोकनेते गणेश नाईक यांनी एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी, महापालिकेचे आयुक्त आणि शासकीय अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. विधानसभेमध्ये देखील याविषयी त्यांनी जोरदार आवाज उठवला होता.
या उन्नत मार्गाची वेळोवेळी पाहणी केली आहे. आजच्या पाहणी दौऱ्यात त्यांनी एमएमआरडीए आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांना सडेतोडपणे इशारा दिला. या दोन्ही मार्गीकासाठी येत्या आठ दिवसात कार्यवाहीबाबत लेखी आश्वासन द्या.
लोकनेते गणेश नाईक यांची आक्रमक भूमिका पाहता एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी काटईच्या दिशेने चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिका ठेवण्याचे मान्य करतानाच मुंबई करिता चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी देखील मार्गीका ठेवू असे मान्य केले यावेळी उपस्थित महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी लोकनेते नाईक यांना आश्वासित करताना सांगितले येत्या मंगळवारी महापालिका अधिकाऱ्यांची आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची एक महत्वाची बैठक होणार असून या बैठकीमध्ये मुंबई कडची मार्गिका देखील मंजूर करण्यात येईल सिग्नल विरहित ठाणे-बेलापूर मार्गासाठी रबाले ते चिंचपाडा असा उड्डाणपूल बांधण्याची वेळ आली तर महापालिकेच्या माध्यमातून तो बांधून घऊ अशी माहिती लोकनेते नाईक यांनी यावेळी दिली. ऐरोली नाट्यगृहाच्या कामाला गती... वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहाप्रमाणेच ऐरोली मध्ये सांस्कृतिक घडामोडींना चालना देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून नाट्यगृहाचे काम हाती घण्यात आले असून या कामाचा पाहणी दौरा देखील आमदार नाईक यांनी केला. नाट्यगृहाच्या बेसमेंटचे काम प्रगतीपथावर असून सर्वात प्रथम वाहनतळ निर्मिती केली जाणार आहे. यामध्ये आतील आणि बाहेरील अशा ४०० गाड्या ठेवता येणार आहेत. संदीप नाईक यांनी या नाट्यगृहासाठी त्यांचा तीस लाख रुपयांचा आमदार निधी दिला होता. या निधीमधून ध्वनीयंत्रणा आणि आसन व्यवस्था बसविण्यात येणार आहे. तर आ. गणेश नाईक यांनी देखील त्यांचा २५ लाखांचा आमदार निधी दिला आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम मार्च २०२२ र्पयंत पूर्ण होणार नागपूरच्या दीक्षाभूमी व्यतिरिक्त महाराष्ट्रात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा देणारे भव्य स्मारक इतरत्र कुठेही नव्हते. त्यामुळे माजी आमदार संदीप नाईक यांच्या संकल्पनेतून ऐरोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक निर्माण करण्याचे ठरले. त्या संकल्पनेनुसार आ. गणेश नाईक यांच्या सूचनेनुसार स्मारकाच्या कामासाठी महापालिकेने निधीची तरतूद केली. स्मारकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र जीवन चरित्र, त्यांचे विचार, त्यांचे साहित्य त्यांच्याविषयीची सचित्र माहिती जनतेसाठी उपलब्ध व्हावी याकरिता सर्व बाबी अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. या स्मारकासाठी आमदार नाईक यांनी त्यांचा ५० लाख रुपयांचा आमदार निधी दिला असून त्या अंतर्गत या स्मारकातील ऑडिओ-व्हिडिओ यंत्रणा तसेच आसन व्यवस्थेची कामे कामे करण्यात येणार आहेत. मार्च अखेरर्पयंत या स्मारकाचे काम पूर्ण होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले असले तरीही ज्या वेळेस या स्मारकाचे काम पूर्ण होईल त्यावेळेस मी समाधानी असेल, अशी भावना आ. गणेश नाईक यांनी यावेळी व्यक्त केली.