बॅरिस्टर अंतूले यांच्या जयंती निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

उरण : काँग्रेसचे ज्येष्ठ  नेते, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय बॅरिस्टर ए आर अंतूले यांच्या जयंती निमित्त अमन पॉलीक्लिनिक व क्वीन्स केअरच्या माध्यमातून ठाकूर अपार्टमेंट शॉप नंबर 2, यश मेडिकलच्या बाजूला, उरण शहर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन काँग्रेसचे अल्पसंख्यांक रायगड जिल्हाध्यक्ष अकलाख शिलोत्री यांनी केले होते. यावेळी रुग्णांना मोफत ओपीडी सेवा देण्यात आली. परिसरातील नागरिकांनी या आरोग्य सेवेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.

यावेळी कोकण विभाग अल्पसंख्यांक उपाध्यक्ष अमरीन मुकरी, मच्छिमार नेते मार्तंड नाखवा, रायगड जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, जिल्हा सरचिटणीस - गणेश सेवक,रायगड जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस -जितेश म्हात्रे, अल्पसंख्यांक रायगड जिल्हाध्यक्ष अकलाख शिलोत्री, ओबीसी सेल रायगड जिल्हाध्यक्ष -उमेश भोईर, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी, उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, तालुका कार्याध्यक्ष चेतन पाटील, महिला तालुकाध्यक्ष रेखा घरत, तालुका उपाध्यक्ष निर्मला पाटील, उरण तालुका सरचिटणीस नदाफ अकबर, तालुकाध्यक्ष सेवा दल - कमळाकर घरत, तालुका उपाध्यक्ष सेवादल - जयवंत पडते, शहराध्यक्ष प्रकाश पाटील, शहर महिला अध्यक्ष अफशा मुकरी, युवक काँग्रेस उपाध्यक्ष उरण शहर -रविंद्र मढवी, शहर उपाध्यक्ष मोहन सिंह, उपसरपंच खोपटे -सुजित म्हात्रे, केगाव काँग्रेस गाव अध्यक्ष सदानंद पाटील आदी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या आरोग्य शिबिरास भेट देऊन या शिबिराचे कौतुक केले. बॅरिस्टर अंतूले यांच्या जयंती निमित्त फ्री आरोग्य तपासणी, फ्री ओपीडीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अमन पॉलीक्लिनिकचे अब्रार शिलोत्री यांनी दिली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सिडकोच्या गोल्फ कोर्सच्या कामासाठी टेकडीवर विना परवानगी खोदकाम