सिडकोच्या गोल्फ कोर्सच्या कामासाठी टेकडीवर विना परवानगी खोदकाम

खारघर: खारघर मधील गोल्फ कोर्सच्या धामोळे पाड्यालगत असलेली नैसर्गिक टेकडीवर खोदकाम करताना परवानगी न घेता खोदकाम करीत असल्यामुळे पनवेल महसूल विभागाने कारवाई करून चार डंपर आणि दोन जेसीबी सील केल्याने पर्यावरण प्रेमी समाधान व्यक्त करीत आहे.  

सिडकोने खारघर  सेक्टर 23 व 24 मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोल्फ कोर्ससाठी 18 होलची रचना केली होती. मात्र यातील काही जमीन ही वनविभागाची असल्यामुळे सिडकोने अकरा होलचे गोल्फ कोर्स उभारले आहे. गोल्फ कोर्सलगत सिडकोची काही जमीन राखीव आहे. सदर जमिनीवर सिडकोकडून उर्वरित नऊ गोल्फ कोर्सच्या कामाला दोन दिवसापासून  सुरुवात करण्यात आली आहे. मात्र गोल्फ कोर्सच्या कामासाठी टेकडीवर जेसीबी लावून खोदकाम करून जमिनी सपाटीकरणाचे काम केले जात असल्यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी पसरली होती. दरम्यान पर्यावरण प्रेमी नेटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी एन कुमार यांनी पनवेल प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांच्याकडॆ लेखी तक्रार केली होती. सदर तक्रारीची दखल घेवून प्रांत अधिकाऱ्याने कळंबोली सर्कल अधिकारी संतोष कचरे यांच्या पथकाने पाहणी केली असता, खोदकाम करताना कोणत्याही प्रकाराची परवानगी घेतली नसल्याचे निदर्शनास येताच दोन जेसीबी आणि चार डंपर शील केल्याने ठेकेदाराचे धाबे दणाणले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ऐरोली ते काटई नाका रस्त्यासाठी एमएमआरडीएच्या वरिष्ठ पातळीवर विशेष बैठक