खारघरमध्ये मालमत्ता कराची होळी करून निषेध

 
खारघर: पालिकेने लावलेल्या मालमत्ता कराला आमचा विरोध नाही. मात्र तो अन्यायकारक नसावे, पालिकेने ग्रामस्थांना लावलेला मालमत्ता कर तिप्पट चौपट असून कर कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाकडे पत्र व्यवहार करूनही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने  खारघर मधील ग्रामस्थांनी पालिकेच्या मालमत्ता कार्यालया समोर मालमत्ता कराची होळी करून निषेध केला. यावेळी शेकापचे नगरसेवक अरविंद म्हात्रे गोपाळ भगत, रवी भगत, रवींद्र म्हात्रे, विष्णू जोशी, माजी जिल्हा परिषद सदस्य राम करावकर, ग्रामस्थ केसरीनाथ पाटील ,फारूक पटेल,मनेश पाटील, नीलकंठ पाटील,मेघनाथ पाटील,संतोष गायकर ,सुरेश ठाकूर  तसेच  नैना प्रकल्प ग्रस्त समितीचे अध्यक्ष ऍड सुरेश ठाकूर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 
 
      पनवेल महानगरपालिका प्रशासनाने खारघर परिसरातील गावांना सहा महिन्यापूर्वी वाढीव मालमत्ता कराची नोटीस पाठविल्या होत्या. यावेळी ग्रामस्थांनी पालिकेच्या खारघर प्रभाग कार्यालयात हरकती नोंदविले होते. पालिका ग्रामस्थाना पालिकाअस्तिवात आल्यावर गावांना ग्राम पंचायतीच्या दरानुसार मालमत्ता कर आकारले जाईल असे आश्वासन दिले होते. तसेच    खारघर मधील ग्रामस्थानी पालिका आयुक्तांची भेट घेवून निवेदन वाढीव, मालमत्ता कर कमी करण्याची मागणी केली होती. मात्र त्यावर कोणत्याही प्रकारचे निर्णय न  घेता  प्रभाग कार्यालयात सुनावणी घेतली जात आहे. सुनावणी घेताना नागरिकांच्या हरकती विचारात न घेता, मालमत्ता कराची मागणी मान्य आहे. अश्या प्रकारचा शेरा लिहिला जात असल्यामुळे ग्रामस्था संताप व्यक्त करीत आहे. पालिकेने पाठविलेल्या मालमत्ता कराच्या विरोधात तीव्र लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान संतापलेल्या नागरिकांनी पालिकेने पाठविलेल्या वाढीव मालमत्ता कराची होळी करीत पालिकेला निषेध केला. तसेच फेब्रुवारी अखेर पालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे अॅड सुरेश ठाकूर यांनी सांगितले. 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बामणदेव मार्ग परिसरात स्वच्छता अभियान