बामणदेव मार्ग परिसरात स्वच्छता अभियान 

नवी मुंबई :- पामबीच मार्गावर सारसोळे खाडीअंर्तगत भागात असणाऱ्या बामणदेवाकडे जाणाऱ्या मार्गाच्या परिसरात सारसोळे ग्रामस्थांच्या वतीने मंगळवारी स्वच्छता अभियान राबवण्यात आले होते. या अभियानात ग्रामस्थांनी  उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत परिसर स्वच्छ केला. 

नवी मुंबईतील ग्रामस्थांमध्ये सारसोळे खाडीमध्ये असणारे बामणदेव दैवत हे श्रध्देचा व जागरूक देवस्थान मानले जाते. नवसाला पावणारा बामणदेव अशी या देवाची नवी मुंबई शहरात ख्याती आहे. खाडीमध्ये मासेमारी करावयास गेल्यावर बामणदेवच आपले रक्षण करतो, अशी येथील ग्रामस्थांची श्रध्दा आहे. बामनदेवाकडे जाणारा मार्ग आजही खाचखळग्यांचा व कच्चा आहे. पावसाळ्यात येथे मानेपर्यत तर कोठे कमरेपर्यत जंगली गवत वाढलेले असते.

 सारसोळेचे ग्रामस्थ हे गेल्या अनेक वर्षापासून महाशिवरात्रीनिमित्त गावातील युवकांनी स्थापन केलेल्या कोलवाणी माता मित्र मंडळाच्या माध्यमातून भंडाऱ्याचे आयोजन करत असतात. या भंडाऱ्यात नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पनवेल-उरण भागातून भाविक मोठ्या संख्येने, मनोभावे सहभागी होत असतात. हा मार्ग पावसानंतर जंगली गवताचा बनल्याने भंडाऱ्याअगोदर काही दिवस या मार्गावर कोलवाणी माता मित्र मंडळाच्या माध्यमातून सारसोळेचे ग्रामस्थ सफाई करून स्वच्छता करतात. दरवर्षी ग्रामस्थ, पोलिस, महापालिका, वनविभाग यांच्या संयुक्त विभागाने या ठिकाणी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात येत असते.

मंगळवारी राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात नवी मुंबई महापालिकेच्या माजी महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. सुजाताताई सुरज पाटील, माजी नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर, जनसेवक व नेरूळ भाजपाचे नेते गणेशदादा भगत, पर्यावरणप्रेमी विनायक गिरी, समाजसेवक गुरू म्हात्रे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष महादेव पवार, शिववाहतुक सनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व शिवसेना शाखाप्रमुख दिलीप आमले यांच्यासह कोलवाणी माता मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य आणि सारसोळे ग्रामस्थ उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बॅरिस्टर अंतूले यांच्या जयंती निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न