सागरी जैवविविधता केंद्र ५०% क्षमतेने सुरू
नवी मुंबई -:ओमायक्रोन या करोनाच्या नवीन प्रकाराचा वाढता संसर्ग पाहता शासनाने सार्वजनिक वापराच्या ठिकाणी काही निर्बध घातले होते. त्यामुळे ऐरोलीतील सागरी जैवविविधता केंद्र नागरिकांनाकरिता बंद करण्यात आले होते. परंतु आता कोविड निर्बधात थोडीफार शिथिलता दिल्याने.१ फेब्रुवारी पासून हे केंद्र खुले करण्यात आले असून ,५०% आसन क्षमतेने बोटिंग सफर सुरू करण्यात आलेली आहे.
नवी मुंबई शहरातील खाडी किनारा आणि जैवविविधता यांची महिती उपलब्ध होण्यासाठी ऐरोलीमध्ये दिवा गावा जबल किनारी आणि सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्र उभारण्यात आले आहे. नवी मुंबई शहरात हिवाळ्यात विशेषतः खाडी किनारी आणि पाणथळ जागेत फ्लेमिंगो सह इतर परदेशी पक्षांचे आगमन होत असते. पक्षीप्रेमी आणि पर्यावरण प्रेमी यांना या पक्ष्यांना पाहण्याची संधी मिळावी म्हणून पक्ष प्रेमींना बोटीने खाडीसफरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नवी मुंबईसह, ठाणे, मुंबईतील पर्यावरण प्रेमींना खाडी किनाऱ्यांचे महत्त्व, जैवविविधतेची माहिती व किनाऱ्यांचे संरक्षण कसे करावे, पक्षीनिरक्षण, नौकाविहार या सुविधांचा समावेश आहे. त्यामुळे याठिकाणी देखील दररोज बोटिंग सफर तसेच केंद्राला भेट देण्यासाठी नागरिक तसेच मोठ्या संख्यने भेटी देत असतात. हे केंद्र देखील करोनाकाळत बंद ठेवण्यात आले होते. आता दि.१ फेब्रुवारी पासुन सुरू करण्यात आले असून आसन क्षमता ही ५०% ठेवण्यात आले आहे. २४ आसनी बोटिंग करिता १२ आसन तर ७ आसनी बोटिंगला ४ आसनी पर्यंत मार्यदा ठेवली आहे. दिवसेंदिवस या केंद्राला नागरिकांची अधिक पसंती मिळत आहे. १ फेब्रुवारी पासून ते आतापर्यंत १५०-२००नागरिकांनी या केंद्राला भेटी दिल्या आहेत ,तर विकेंडला बोटिंग सफरीला भरघोस प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एन जे कोकरे यांनी दिली आहे.