नेरूळमध्ये ई-श्रम कार्ड आणि युनिव्हर्सल कार्ड शिबीर संपन्न

नवी मुंबई : प्रभाग क्र. ३४ भाजपा अध्यक्ष ॲड. गणेश रसाळ यांच्यातर्फे मोफत ई-श्रम कार्ड आणि युनिव्हर्सल कार्ड शिबीर रविवारी आयोजित करण्यात आले होते. यावेळी भाजप कार्यालय, सेक्टर-८ नेरुळ येथील या शिबिराचा ४०० गरजूंनी लाभ घेतला. माजी महापौर सागर नाईक, युवा नेते सुरज पाटील, अक्षय पाटील यांनी शिबिराला भेट देऊन कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले. भाऊ ठाकुर, हेमंत पोमन, नारायण धोंडे, सुधीर वाघमारे, भिका कदम, लक्ष्मण सणस, राजेश बोरले, निखिल नेटके आदींनी शिबिरासाठी मेहनत घेतली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून खारघर येथे स्वछता मोहिमेचे आयोजन