नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व डीएफसी-कॅरीडोरमुळे बंबावीपाडा गावाचे हाल
जेएनपीटी : नवीमुंबई एअरपोर्ट व डीएफसी -कॅरीडोरमुळे बंबावी गावाला ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्यावर योग्य त्या उपाययोजना करून त्यातून लवकरच मार्ग काढुन येथील जनतेचे जे हाल चालले आहेत त्यातून लवकरच सुटका करण्यात येईल असे प्रतिपादन रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी बंबावी पाडा येथे केले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतलासाठी बंबावी पाडा परिसरात डोंगरांचे सपाटीकरण सुरू आहे त्यासाठी डोंगर फोडण्यासाठी मोठया प्रमाणात ब्लास्टिंग करण्यात आली या ब्लास्टींग दरम्यान गावातील घरांवर मोठी दगडे पडून घरातील पत्रे, काैले फुटून घरांना मोठया प्रमाणात तडे गेले आहेत. हि बातमी महेंद्र घरत यांना समजल्यावर त्यांनी ताबडतोब बंबावी गावात धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली आणि यावेळी त्यांनी बंबावीपाडा ग्रामस्थांना सांगितले कि दोन दिवसात सिडको अधिकारी यांना गावात आणुन त्यांच्या सोबत चर्चा करणार. त्याप्रमाणे लगेचच बंबावीपाडा गावात सिडकोचे सुप्रिडेंट इंजिनियर गोसावी, पनवेल तहसीलचे नायब तहसीलदार यांची संपूर्ण टीम बोलावण्यात आली. सिडकोचे अधिकारी गोसावी यांनी सांगितले कि ब्लास्टिंगच्या संदर्भात आम्ही चौकशी करणार आहोत. परंतु यापुढे गावातील घरांवर दगडे येणार नाहीत किंवा घरांना तडे जाणार नाहीत. याची दक्षता घेतली जाईल, ज्यांचे यामध्ये नुकसान झालेले आहेत त्यांना 100% नुकसान भरपाई दिली जाईल. त्याप्रमाणे बंबावी गावातील पाण्याचा प्रश्न बिकट आहे. सिडकोच्या हेटवणे धरणाची पाईप लाईन या ठिकाणाहून गेलेली आहे. त्या पाईप लाईन मधून बंबावी पाडा गावाला पाईप लाईनद्वारे पाणी देण्याचे. यावेळी त्यांनी मान्य केले आहे. तसेच डीएफसी-कॅरीडोरने जो अंडरपास केलेला आहे त्यामध्ये लाईटची सुविधा नाही, सांडपाण्याचा निचरा होत नाही. डिएफसी-कॅरीडोर अधिकारी यांनी रेल्वेने जे गटार काढले आहे ते चुकीच्या पद्धतीने काढले आहे. त्यामुळे अंडरपासच्या भुयारी मार्गत मोठया प्रमाणात पाणी साचत आहे. याचा नाहक त्रास येथील स्थानिक, शाळकरी मुले, महिला यांना होत आहे. या संदर्भात डिएफसी-कॅरीडोर अधिकाऱ्यांना येथे आणण्यात येईल व त्यांच्या सोबत बैठक करण्यात येईल. येथील साचत असलेले सांडपाणी बाहेर निघाले पाहिजे, भुयारी अंडरपासमध्ये लाईटची सुविधा असली पाहिजे याठिकाणी रेल्वे क्रॉसिंगसाठी मोठी शिडीची व्यवस्था असायला पाहिजे. या सर्व मुद्यानवर चर्चा करण्यात आली आणि पुढच्या आठवढ्यात यावर बैठक घेऊन यातुन मार्ग काढण्यात येईल तसेच बंबावी गावाच्या ज्या काही समस्या आहेत त्या दुर केल्या जातील. असे रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी सांगितले. यावेळी सिडकोचे सुप्रिडेंट इंजिनियर गोसावी, पनवेल नायब तहसीलदार व त्यांची संपूर्ण टीम आणि बंबावी गावातील ग्रामपंचायत सद्स्या भारती भोईर, वंदना पाटील, ग्रामस्थ- शिवदास पाटील, प्रमोद पाटील, हरेश्वर भोईर, प्रभाकर मुंडकर, कमलाकर पाटील, सुभाष पाटील, सुभाष मुंडकर, व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.