एपीएमसी बाजारात आरोग्यदायी रंगीबेरंगी फ्लॉवर दाखल
नवी मुंबई -:आजवर बाजारात विविध रंगाची शिमला मिर्ची पहावयेते मिळत होती. मात्र आता प्रथमच पिवळा आणि जांभळा असा रंगीबेरंगी आरोग्यादायी २ हजार किलो फ्लॉवर कृषी उत्तअन्न बाजार समितीच्या भाजीपाला आवारात दाखल झाला आहे. नाशिक च्या शेतकऱ्याने प्रयोगशील असे फ्लॉवरचे उत्तरण केले असून ते आरोग्यदायी आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत शिमला मीरची सोडली तर नेहमीच हिरवागार भाजीपाल्याची आवक होत असते. आता बाजारात ग्राहकांसाठी रंगीत फ्लॉवर ही दाखल होत आहेत. नाशिक येथील वासोळ येथून शनिवार ५ फेब्रुवारी रोजी हेमंत देसले या शेतकऱ्यांनी प्रथमच बाजारात कर्करोग रोगावरील उपचारासाठी उपयुक्त आणि जीवनसत्त्व अ असलेला असा आरोग्यदायी फ्लॉवर व्यापारी श्रेयस जाधव यांच्याकडे बाजारात विक्रीसाठी आणलेला आहे. एकूण २ हजार किलो करोटेना पिवळसर आणि वॅलेंटेना म्हणजे जांभळ्या फ्लॉवरची आवक झाली आहे. बाजारात पहिल्यांदाच असा रंगीत फ्लावर दाखल झाला असून आज बाजारात त्याची ५०% विक्री झाली आहे. मात्र पुढील कालावधीत ग्राहकांना हा फ्लॉवर किती पसंतीस पडतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल असे मत घाऊक व्यापारी श्रेयस जाधव यांनी व्यक्त केले आहे.
कर्करोगावरील उपचारासाठी उपयुक्त
एपीएमसी बाजारात दाखल झालेला हा रंगीत फ्लॉवर दिसायला आकर्षक ठरत आहे.पहिल्यांदाच पांढरा शुभ्र व्यतिरिक्त असा दोन वेगळ्या रंगात दाखल झालेला फ्लॉवर ग्राहकांना आकर्षित करीत आहे. हा पिवळा आणि जांभळा असा फ्लॉवरमध्ये भरघोस अ जीवनसत्त्वे आहेत. तसेच हा कर्करोग रोगावरील उपचारासाठी उपयुक्त आहे अशी महिती मिळत आहे. सध्या या प्रजातीचा फ्लावरव्ह लागवड आणि उत्पादन हे फ्रान्स आणि लंडन विदेशात तर देशातील बिहार मध्ये घेतले जाते.