सानपाडा येथील अर्धवट पादचारी पुलाचे काम लागणार मार्गी

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोरील सानपाडा हायवेवर पादचाऱ्यांना रस्ता पार करता यावा म्हणून पादचारी पुलाची निर्मिती केली आहे. मात्र सदर पादचारी अर्धवट असून एका बाजूचे पुलाचे काम अजून बाकी आहे.त्यामुळे  हे काम पूर्ण करावे म्हणून शिवसेचे माजी शिवसनेचे नगरसेवक सोमनाथ वास्कर व नगरसेविका कोमल वास्कर यांनी वारंवार पाठपुरावा केला होता आणि याबाबत आता महारेल सोबत चर्चा केल्या नंतर सदर पादचारी पुलासोबत येथील इतर कामे ही मार्गी लावणार असल्याचे आश्वासन महारेल मार्फत देण्यात आले आहे अशी माहिती सोमनाथ वास्कर यांनी दिली आहे.

सायन पनवेल महामार्गावर रस्ता पार कारण्यासाठी पादचारी पूल बांधला आहे.मात्र हा पादचारी पूल एकाच रस्त्यावर बांधलेला आहे व उर्वरित रस्त्यावर पुलाचे बांधकाम केले नाही. परिणामी पादचाऱ्यांना अर्धा रस्ता आपला जीव मुठीत घेऊन तर अर्धा रस्ता पुलावरून पार करावा लागत आहे. त्यामुळे हा पूल कधी पूर्ण होणार याकडे पादचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. एकीकडे सायन-पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असल्यामुळे हा रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांची दमछाक होते. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या पुलाचे काम पूर्ण करावे म्हणून माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वारंवार पाठपुरावा केला आहे.तर आता या ठिकाणी महारेल मार्फत नवीन उड्डाणपुलांचे काम हाथी घेण्यात आले आहे. आणि या कामावर सोमनाथ वास्कर  यांनी धडक देत पादचारी पूल कधी बनवणार असा जाब विचारला. त्यानंतर महारेल च्या अभियंत्यांनी वास्कर यांच्या सोबत चर्चा केल्या नंतर सदर पादचारी पूल बनवन्याचे आश्वासन दिले सोबतच दत्त मंदिर जवळील इतर कामे ही करून देण्याचे मान्य  केले.त्यामुळे वास्कर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून लवकरच या पादचारी पुलाचे काम मार्गी लागणार असून नागरीकांची जीवघेणी कसरत थांबणार आहे.अशी माहिती माजी नगरसेक सोमनाथ वास्कर यांनी दिली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी बाजारात आरोग्यदायी रंगीबेरंगी फ्लॉवर दाखल