माऊली सोसायटीच्या निकालातुन परिवर्तनाचा शंखनाद

नवी मुंबई-:घणसोली मधील माऊली कृपा सोसायटीत निवडणूक आधी झालेल्या मारामारीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे द्वंद्व रंगले होते. याचा निकाल ६फेब्रुवारी रोजी लागला असून महाविकास आघाडीच्या परिवर्तन पॅनेल ने १७ पैकी १७ जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे या निकालाने आगामी महापापालिका निवडणूकीच्या विजयाचा शंखनाद महावीकास आघाडीने फुंकलाआहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.

जुन्या इमारतींचा पुनरर्विकास आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय नेत्यांनी आता खाजगी सोसायट्यांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे.त्यामुळे या सोसायटीच्या निवडणूकात राजकीय हस्तक्षेप वाढू लागला आहे.घणसोली मधील सर्वात मोठी आणि सर्वात जास्त माथाडी कामगारांची वसाहत असलेल्या माऊली कृपा सोसायटीची निवडणूक रविवारी पार पडली.मात्र ही निवडणूक लागताच या निवडणुकीत राजकीय रंग चढला होता.कारण महाविकास आघाडीची कमान राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे पुतणे सौरभ शिंदे यांनी सांभाळली होती.त्यांच्या जोडीला प्रचारासाठी मनपाचे माजी विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांनी साथ दिली होती. त्यामुळे ही नीवडणुक नगरसेवक पदाची सेमिफायनल मानली जात असल्याने ही निवडणूक चुरशिची होणार होती हे नक्की.आणि झाले हे तसेच कारण निवडणूकीच्या दोन दिवस आधीच माघी गणेशउत्सवादरम्यान या सोसायटीत भाजप आणि महावीकास आघाडीच्या कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी झाली होती. मात्र ६ तारखेला ही निवडणूक पार पडली आणि याचा निकाल लागला. त्यात महाविकास आघाडीच्या परिवर्तन पॅनेल ने उन्नती पॅनलवर १७ -० असा  दणदणीत विजय मिळवला आहे.त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाने महाविकास आघाडीने विजयाचा शंखनाद फुंकला असून याने आमदार गणेश गणेश नाईक व माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना देखील इशारा दिला आहे की माथाडी कामगार कुणाच्या बाजूने उभे राहतील आणि कुणाच्या नाही.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सानपाडा येथील अर्धवट पादचारी पुलाचे काम लागणार मार्गी