नवी मुंबईमध्ये रत्नदिप स्पोर्ट्स असोशिएसनचे क्रिकेट प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन

नवी मुंबई : रत्नदिप स्पोर्ट्स असोशिएसन मार्फत 8 ते 15 वर्षे वयोगटातील मुलां- मुलींकरीता नवी मुंबईमध्ये आधुनिक सिझन क्रिकेट प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सह सचिव शहा आलम सर व शिवसेना उप जिल्हा प्रमुख मिलींद सुर्यराव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बी.सी.सी.आय. लेव्हल 2 चे कोच दिलीप पाटील सर, क्रिकेट प्रशिक्षक नंदू दोनवलकर, स्थानिक मा. नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार, विशाल ससाणे, समाजसेवक किरण मेहर, क्रिकेट प्रशिक्षक दर्शन भोईर, प्रकाश टिपणीस, राजन मुणगेकर त्याचप्रमाणे खेळाडू व त्यांचे पालक उपस्थित होते.

स्थानिक मा. नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार, विशाल ससाणे, समाजसेवक किरण मेहर, यांनी गरजू व होतकरू मुलांना क्रिकेट प्रशिक्षण स्थानिक पातळीवर उपलब्ध होणेसाठी नवी मुंबई जुईनगर सेक्टर-25 येथील मैदान तसेच त्याकरीता आवश्यक सुविधा करून देण्याकरीता विशेष प्रयत्न केले असल्याने रत्नदिप स्पोर्ट्स असोशिएशन मार्फत तसेच खेळाडू व पालकांमार्फल आभार मानले उद्घाटन प्रसंगी बी.सी.सी.आय. लेव्हल 2 चे कोच दिलीप पाटील सर यानी खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले.

नवी मुंबई मधील गरजू व होतकरू मुलांना क्रिकेट प्रशिक्षण स्थानिक पातळीवर उपलब्ध होत असल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

माऊली सोसायटीच्या निकालातुन परिवर्तनाचा शंखनाद