सिडकोकडून खारघर गावातील समाज मंदिर पालिकेकडे हस्तांतरण , ग्रामस्थ समाधानी 

खारघर:  खारघर गावात भूखंड क्रमांक 137 या जागेवर अर्धवट बांधकाम करून पडलेला 1956.33  चौरस मीटरचा समाज मंदिर आमदार प्रशांत ठाकूर  यांचे सहकार्य आणि नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या प्रयत्नाने पालिकेकडे हस्तांतर करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. 

खारघर परिसरातील शेतकऱ्यांची जमीन सिडकोने हस्तांतर केली. गावात कौलारू घरांची जागेवर इमारती उभ्या झाल्या. गावालगत असलेल्या मोकळ्या जागेवर विकासकाकडून टोलेजंग इमारतीचे बांधकाम करण्यात आल्यामुळे गावातील  लग्न  सोहळा तसेच इतर कार्यक्रमासाठी परिसरातील मोकळा भूखंडाचा शोध घेवून सिडकोकडून परवानगी घेवून कार्यकम पार पडला जात असे, सदर जागेसाठी सिडकोकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकाराला जात असे, ग्राम पंचायतीच्या काळात ग्रामस्थांनी गावात विविध कार्यक्रमासाठी समाज मंदिराची उभारणी करावे असा ठराव मंजूर करण्यात आला. दरम्यान सन 2013-14 साली   सेक्टर तेरा मधील  भूखंड क्रमांक 137 भूखंडावर एक कोटी रुपये खर्च करून ग्राम पंचायतीने रितसर समाज मंदिराचे काम सुरू झाले. तळ मजल्याचे काम सुरु असताना सिडकोने सदर बांधकाम करण्यास मनाई केली. दरम्यान पनवेल पालिकेची स्थापना झाल्यावर खारघर हे पालिकेत समावेश झाल्यामुळे नगरसेवक प्रवीण पाटील यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे आणि सिडकोकडे पत्र व्यवहार करून गावातील समाज मंदिराचा प्रश्न मार्गी लावण्यात यावे साठी प्रयत्न सुरु होते. तर सिडकोकडून सदर भूखंडासाठी मोठ्या प्रमाणात शुल्क आकारणी केली जात असे, खारघर ग्रामस्थांच्या जमिनीवर खारघर शहर उभे आहे. त्यामुळे   सदर भूखंड नाममात्र दरात सिडकोने भूखंड देणे हे सिडकोचे कर्तव्य असल्याचे सांगितले .अखेर सिडकोकडून केवळ  साठ रुपयांत भूखंड पालिकेकडे हस्तांतर करण्यात आल्यामुळे ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जेएनपीटी प्रशासन विरोधात जेएनपीटी स्थानिक प्रकल्पग्रस्त मजूर संस्था करणार तीव्र आंदोलन