पालिकेच्या मालमत्ता करास नागरिकांचा प्रचंड विरोध

खारघर: पनवेल महापालिकेने लावलेला जिझिया मालमत्ता कराच्या विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून सोमवार 7 फेब्रुवारी पालिकेच्या खारघर प्रभाग कार्यालया समोर मालमत्ता कराची जाहीर होळी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी कोपरा गाव येथे झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी ऍड सुरेश ठाकूर, ऍड. विजय गडगे ,संतोष गायकर, मदन पवार, संतोष तांबोळी,रमाकांत पाटील  गोटीराम  तोडेकर,केसरी पाटील, जगदीश ठाकूर , मनेश पाटील, कमलाकर जले  अरुण पाटील ,दत्ता वर्तेकर,   सुधाकर तोडेकर ,वामन घरत ,मेघनाथ पाटील, यांच्यासह ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते. 
 
   पनवेल महानगरपालिका प्रशासनाने खारघर परिसरातील गावांना सहा महिन्यापूर्वी  2016 पासून वाढीव मालमत्ता  कराची नोटीस पाठविल्या होत्या. यावेळी ग्रामस्थांनी पालिकेच्या खारघर प्रभाग कार्यालयात  हरकती नोंदविले होते. तर खारघर मधील ग्रामस्थानी पालिका आयुक्तांची भेट घेवून निवेदन दिले होते. त्यामुळे वाढीव मालमत्ता कर रद्द होणार असे ग्रामस्थांना वाटत होते. मात्र पुन्हा पालिकेने त्यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय न घेता सुनावणी घेत  असल्यामुळे  ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून वाढीव मालमत्ता कर न भरण्याचा ठराव ग्रामस्थांनी कोपरा येथे पार पडलेल्या बैठकीत केला. तसेच  येत्या सात फेब्रुवारीला खारघर मधील प्रभाग कार्यालय समोर मालमत्ता कराच्या नोटिसाची जाहीर  होळी पेठविण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आले.तसेच  लवकरच पालिका  निवेदन देवून  फेब्रुवारी अखेर खारघर ते पनवेल पायी मोर्चा काढण्यात येणार असून  मालमत्ता कर रद्द करावा नाहीतर कर न भरो जनआंदोलन करण्याचा संकल्प ग्रामस्थानी केला.  
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भूखंड हस्तांतरण होताच खारघरमधील दाऊदी बोहरा समुदायासाठी दफनभूमी -आयुक्तांचे आश्वासन