भूखंड हस्तांतरण होताच खारघरमधील दाऊदी बोहरा समुदायासाठी दफनभूमी -आयुक्तांचे आश्वासन

खारघर: सिडकोकडून खारघर मधील भूखंड पालिकेकडे हस्तांतरण प्रक्रिया सुरू आहे. भूखंड हस्तांतरण होताच खारघर खारघरमध्ये असलेल्या दाऊदी बोहरा समाज दफनभूमीसाठी भूखंड दिले जाईल असे आश्वासन पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले. 

   खारघर परिसरात दाऊदी बोहरा समाज असून निधन झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी मृतदेह कोपर खैरणे किंवा मुंब्रा येथे घेवून जावे लागते. त्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.पालिकेने दफनभूमी साठी भूखंड द्यावे यासाठी 2 फेब्रुवारीला  खारघर तळोजा कॉलनी वेल्फेअर असोसिएशनचे  अध्यक्ष  मंगेश रानवडे, जोएब शेख यांच्यासह दाऊदी बोहरा जमात ट्रस्टचे पदाधिकारी शेख अबीजर राजकोटवाला, मुर्तझा हार्नेसवाल, जोएब शेख, अलियासगर बनतवाला आदी शिष्टमंडळाने आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेतली यावेळी आयुक्तांनी  उपायुक्त सचिन  पवार आणि उपायुक्त कैलास यांच्याशी चर्चा केली असता, सिडकोकडून भूखंड हस्तांतरण प्रक्रिया सुरू असल्याचे समजले. यावेळी आयुक्तांनी सिडकोकडून भूखंड हस्तांतरण झाल्यावर दफनभूमी साठी भूखंड उपलब्ध करून दिले जाईल असे आश्वासन दिले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जागतिक कर्करोग दिनानिमित्त तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रिक्षाचालकांची मोफत कर्करोग तपासणी