सौ. शांता जाधव यांची शिवसेना बंजारा समाज नवीमुंबई जिल्हा महिला अध्यक्षा पदी नियुक्ती

नवी मुंबई : शिवसेना बंजारा समाज नवी मंबई जिल्ह्याचे अध्यक्ष गुलाब भिडे, तथा शिवसेना नेते सुरेशजी कुलकर्णी यांच्या हस्ते शिवसेना बंजारा समाज नवी मुंबई जिल्हा महिला अध्यक्षा पदी सौ शांता रवी जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. ह्या वेळी नवीमुंबई जिल्ह्यातील 10 हजाराहून अधिक बंजारा समाजाच्या अडी अडचणी सोडवन्यासाठी प्रयत्न करणार आहे तसेच शिवसेना पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून पक्ष वाढीसाठी कामं करणार असल्याचे मत नवनियुक्त नवीमुंबई जिल्हा महिला अध्यक्षा बंजारा समाज सौ. शांता रवी जाधव यांनी मांडले.

यावेळी शिवसेना पदाधिकारी विनोद मुखे, अजय गुप्ता,प्रदीप वाघमारे, तय्यब पटेल,विष्णू चव्हाण,के. आर. वाघमारे, केशव लाल मौर्या, बाळकृष्ण खोपडे, शिवाजी शिंदे, अरविंद जाधव, विजय ढामाळ उपस्थित हाेते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मालमत्ता जप्तीच्या कारवाईला स्थगिती