मालमत्ता जप्तीच्या कारवाईला स्थगिती

नवी मुंबई-: मलमत्तांचे हप्ते न भरणाऱ्या नागरिकांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई बँकाकडून सुरू होती. मात्र मागील दोन वर्षापासुन कोविड महामारी सुरू असल्याने बहुतांशी नागरीकांचे रोजगार गेल्याने।हप्ते भरण्यास अडचन येत आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या मालमत्ता जप्तीला स्थगीती द्यावी अशी मागणी मनसे सहकार सेने तर्फे ठाणे जिल्हाधीकारी यांना करण्यात आली होती आणि या मागणीची दखल घेत मालमत्ता जप्तीला ३१ जानेवारी  पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.

मागील दीड दोन वर्षांपासून राज्यात कोविडची महामारी सुरू असल्याने अनेक जणांचे व्यवसाय व रोजगार हिरावले आहेत. त्यामुळे अशा नागरीकांना आपल्या मालमत्तांचे सुरळीत कर्ज फेडता आले नाही. मात्र अशा मालमत्तांवर बँकांकडुन जप्ती सुरू केली आहे. त्यामुळे सदर मलमत्तांच्या जप्तीच्या कारवाईस तातपुरती स्थगिती द्यावी अशी मागणी मनसे सहकार सनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी पठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे  निवेदन देऊन केली होती. या मागणीला यश आले असून सर्व प्रकारच्या मालमत्ता जप्तीच्या कारवाईस ३१ जानेवारी पर्यत स्थगीती देण्यात आली आहे. असे आदेश  तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी ठाणे यांनी काढले आहेत. त्यामुळे मनसे सहकार स्नेनेच्या पाठपुराव्याला यश आले असून मालमत्ता थकीत कर्जदारांना दिलासा मिळाला आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल रेल्वे स्थानक परिसरात प्रिपेड ऑटो रिक्षा बुथ चालविण्याकरीता इच्छुकांना आवाहन