पावसाळापूर्व नालेसफाई, नागरी कामांची आयुक्तांकडून पाहणी

नवी मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी शहरभर पाहणी दौरा केला. घणसोली-ऐरोली खाडीवरील पुलाच्या कामापासून सुरू झालेल्या या दौऱ्यात आयुक्तांनी नालेसफाई, वाहतूक कोंडी, स्मशानभूमीतील सुविधा आणि आरोग्य केंद्रांच्या कामांचा आढावा घेतला. नाल्यांमधील गाळ सुकल्यानंतर तो तातडीने उचलण्याचे आणि पावसाळ्यापूर्वी नागरी सुविधांची कामे पूर्ण करण्याचे कडक निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

वाशी, सेवटर-२६ (कोपरी), सेक्टर-१७ वाशी, सेक्टर-२९ आणि सानपाडा सेक्टर-११ येथील नाल्यांची पाहणी करुन गाळ खोलवर काढण्याच्या आणि सुकल्यानंतर तो लगेच हटवण्याच्या सूचना आयुवत डॉ. शिंदे यांनी दिल्या. नाल्यांच्या कडेची झाडेझुडपे छाटणे, कोपरी येथील पुलाची भिंत उंच करणे आणि रस्त्याकडील बाजूस कुंपण भिंत बांधण्याचे निर्देश त्यांनी दिले.

नाल्यात दूषित पाणी येऊ नये यासाठी एमआयडीसी, एमपीसीबी आणि महापालिका अभियंत्यांनी संयुक्त पाहणी करावी. ज्या ठिकाणी पाणी दूषित होते, तिथे छोटे मलप्रक्रिया युनिट उभारण्याचे आदेशही यावेळी आयुवतांनी दिले.

घणसोली-ऐरोली पामबीच ब्रीजच्या ८९ पैकी ४४ पिअर्सचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम जून अखेरपर्यंत पिअर कॅपपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यास आयुवतांनी अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच गर्डर लाँचिंगचे काम सुरू झाल्यावर त्यात खंड पडू नये यासाठी दिनांकनिहाय नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तळवली नाक्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आयआयटी तज्ञांची मदत घेऊन आराखडा तयार करण्याचे निर्देश तसेच रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत उभ्या राहणाऱ्या वाहनांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश आयुवत डॉ. कैलास शिंदे यांनी यावेळी दिले.

कोपरी स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी स्नानगृह, पिण्याचे पाणी आणि अस्थी ठेवण्यासाठी लॉकरची व्यवस्था करण्याचे सुचविण्यात आले. सेक्टर-२९ वाशी येथील आयुष्मान आरोग्य मंदिर परिसराचे सुशोभिकरण, वाशी सेक्टर-७ मधील अंडरपास आणि कोपरी ॲम्युझमेंट पार्क मधील कासवाच्या प्रतिकृतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे तसेच वाशीगांव येथील तात्पुरत्या भाजी व मासळी मार्केटसाठी सिडकोकडून भूखंड घेण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी आयुवतांनी दिल्या.

आयुवतांच्या या दौऱ्याप्रसंगी अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, विविध विभागांचे उपायुक्त सोमनाथ पोटरे, संजय शिंदे, स्मिता काळे, डॉ. अजय गडदे आणि कार्यकारी अभियंता उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भिवंडी बस स्थानकाची दुरवस्था