सच्चिदानंद सुरेश शेवडे यांच्या व्याख्यानास चांगला प्रतिसाद
५ एप्रिल रोजी संध्याकाळी गिरगाव कट्टा बोरिवली प्रस्तुत व बोरिवली विचार मंचतर्फे आयोजित सकल हिंदू संमेलनात मार्गदर्शन करण्यासाठी हिंदू - काल व आज या विषयावर प्रख्यात प्रवचनकार डॉक्टर सच्चिदानंद सुरेश शेवडे यांचे ओघवते व प्रभावी प्रवचन पार पडले.
सर्व श्रोत्यांना अत्यंत महत्वाचा, ज्वलंत, गरजेचा विचार करण्यासाठी हा कार्यक्रम फारच उद्बोधक होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शंखनाद केल्यावर सु.प्र. संघाच्या वतीने अनेक गीतांचे सादरीकरण व महिलांतर्फे शिव तांडवस्तोत्र सामुदायिक पठण केले गेले. शेवटी पूर्ण वंदे मातरम सादर करुन कार्यक्रमाची समाप्ती झाली.