ज्येष्ठ रंगकर्मी श्रीहरी पवळे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

नवी मुंबई  : कलेची नगरी असलेल्या ऐतिहासिक करवीर नगरीत व्ही. टी. पाटील सभागृह ताराराणी विद्यापीठ येथे नवी मुंबईतील ज्येष्ठ रंगकर्मी सुप्रसिद्ध रांगोळीकार श्रीहरी पवळे यांना ५ एप्रिल रोजी बालनाट्य क्षेत्रात मोठे योगदान दिल्याबद्दल स्वराज्य युवा प्रतिष्ठान व ताराराणी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष समीर काळे आणि सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सतत २९ वर्षे श्रीहरी पवळे यांनी बाल नाट्य चळवळ अखंडपणे सुरु ठेवली आहे.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील ५० कलागुणी कला क्रीडा क्षेत्रातील योगदान देणाऱ्या कलाकारांचे सन्मान करून गौरविण्यात आले. नवी मुंबईतील विविध नाट्य संस्था बालकलाकार आणि त्यांचे पालक श्रीहरी पवळे यांना राज्यस्तरीय रायझिंग स्टार पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सच्चिदानंद सुरेश शेवडे यांच्या व्याख्यानास चांगला प्रतिसाद