कल्याण बाजार समितीत शेतमाल पडून
कल्याण : अमेरिका-इस्रायल-इराण युध्दाच्या तणावाचे पडसाद आता थेट शेतकऱ्यांवर उमटताना दिसत आहेत. अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्यात मार्गांवर परिणाम झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतमाल देशांतर्गत बाजारात येत असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
कल्याण मधील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात भाज्या, फळे आणि इतर शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने दर कोसळले असून शेतकरी आणि व्यापारी दोघेही चिंतेत आहेत. तर विक्री होत नसल्याने व्यापाऱ्यांसमोरही मोठे संकट उभे राहिले आहे. त्यातच हॉटेल व्यवसायात कमर्शियल गॅसचा तुटवडा असल्याने हॉटेलमध्ये होणारी भाजीपाला विक्रीही कमी झाली आहे. आता या परिस्थिती मूळ शेतकरी आणि व्यापारी हवालदिल झाले आहेत. युध्द कधी थांबणार? याकडे सर्व डोळे लावून बसले आहेत.