सिडको येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
नवी मुंबई : सिडको एम्पलॉईज युनियनतर्फे शिवजयंती उत्सव सोहळा 20 फेब्रुवारी सिडको भवन येथे उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी सिडकोचे सह-व्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल,गणेश देशमुख आणि व्यवस्थापक (कार्मिक) विनु नायर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यांसोबत सिडको एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष सुभाष पाटील, सरचिटणीस नितीन कांबळे यांसह सिडकोतील विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.
या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सह-व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे अतुलनीय असून त्यांचे प्रजाहितदक्षपणा, सर्वांना समान न्याय, कर्तव्यनिष्ठा असे विविध गुण सर्वांनी अंगी बाणवण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या अखेरीस उदय साटम दिग्दर्शित “शिव स्वराज्य गाथा” या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधारित जीवनावर आधारित भव्य संगीतमय नाट्यकृतीने उपस्थितांची मने जिंकून घेतली.