कबड्डी महाराष्ट्राचा श्वास, तर रायगड जिल्ह्याची माती कबड्डीपटूंची खाण" - आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल: महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली कबड्डी हा राज्याचा श्वास असून रायगड जिल्हा ही खऱ्या अर्थाने प्रतिभावंत कबड्डीपटूंची खाण आहे, असे गौरवपूर्ण उद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उलवे नोड येथील सेक्टर १२ मधील भव्य मैदानावर आयोजित 'रायगड जिल्हास्तरीय प्रौढ महिला व पुरुष निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२६' च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

ही स्पर्धा २० ते २२ फेब्रुवारी या कालावधीत रंगणार असून, यात जिल्ह्यातील १२८ पुरुष आणि ३२ महिला संघ सहभागी झाले आहेत. आमदार महेश बालदी यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून या स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन झाले. यावेळी ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, माजी सरकार्यवाह ॲड. आस्वाद पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेतून निवडला जाणारा संघ राज्यस्तरीय स्पर्धेत रायगडचे प्रतिनिधित्व करेल.
शिर्षक: उलवे नोडमध्ये कबड्डीचा महाकुंभ; १२८ पुरुष व ३२ महिला संघांची रायगड अजिंक्यपदासाठी झुंज

पनवेल (प्रतिनिधी): उलवे येथील रामशेठ ठाकूर मैदानावर आजपासून रायगड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार सुरू झाला आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगडच्या कबड्डी परंपरेचे कौतुक करताना सांगितले की, "पेण, अलिबाग प्रमाणेच आता पनवेल-उलवे परिसरातही प्रो-कबड्डी आणि नागरीकरणामुळे या खेळाची व्याप्ती वाढत आहे." स्पर्धेसाठी सुसज्ज चार क्रीडांगणे, प्रेक्षक गॅलरी आणि १०० पंचांची व्यवस्था करण्यात आली आहे. या स्पर्धेतून उद्याचे 'शिवछत्रपती' आणि 'अर्जुनवीर' खेळाडू घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईला माझी वसुंधरा अभियान-४, ५ मध्ये द्वितीय क्रमांक